कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उपराष्ट्रपती निवडणुकीची तयारी जोरदार

07:00 AM Aug 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदत्याग केल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची सज्जता करण्यात प्रारंभ केला आहे. आयोगाने या निवडणुकीचा मतदारसंघ निश्चित केला आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांचे सदस्य असणारेच मतदार या  निवडणुकीत मतदान करु शकतात. प्रत्येक सदस्याला एक प्रातिनिधीक मत देता येते. आयोगाने या निवडणुकीकरिता मतदारसूची सज्ज केल्याची माहिती आहे. या निवडणुकीची अधिसूचना येत्या काही दिवसांमध्ये काढण्यात येणार आहे. त्यानंतर या निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत काही जागा सध्या रिकाम्या आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या कमी झाली आहे. या निवडणुकीत उमेदवार कोण असतील, यावर आता चर्चा होत आहे दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बहुमत असल्याने या आघाडीचा उमेदवार निवडून येणार, हे निश्चित मानण्यात येत आहे. मात्र, उमेदवार भारतीय जनता पक्षाचा असणार, की मित्र पक्षांचा हे स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article