For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये राम मंदिराची तयारी

06:28 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
त्रिनिदाद अँड टोबॅगोमध्ये राम मंदिराची तयारी
Advertisement

कॅरेबियन देशाच्या सरकारची मंजुरी : अयोध्यानगरीचा प्रस्ताव

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन

कॅरेबियन देश त्रिनिदाद अँड टोबॅगो स्वत:ची राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये एका भव्य राम मंदिराच्या उभारणीची तयारी करत आहे. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीला कॅरेबियन क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. सुमारे 15 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात 3.5 लाखाहून अधिक हिंदूंचे वास्तव्य आहे. या देशात हिंदूंचा मोठा सांस्कृतिक प्रभाव आहे.

Advertisement

हिंदू धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा आजही राष्ट्रीय जीवनात खोलवर रुजलेला हा अमेरिका खंडातील निवडक देशांपैकी एक आहे. याचमुळे त्रिनिदाद अँड टोबॅगोला दीर्घकाळापासून ‘रामायण कंट्री’च्या स्वरुपात ओळखले जाते. देशाच्या पब्लिक यूटिलिटीज मंत्री बॅरी पदरथ यांनी धार्मिक नेत्यांसोबत अलिकडेच झालेल्या बैठकीत मंदिर उभारणीच्या पुढाकाराबद्दल सरकारच्या समर्थनाची घोषणा केली आहे.

त्रिनिदाद अँड टोबॅगोला ‘रामायण कंट्री’ म्हटले जाते. येथे शतकांपासून भारतीय परंपरा जिवंत असून सरकार हा वारसा पुढे नेण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आमचे सरकार या प्रकल्पाकडे केवळ धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे तर सांस्कृतिक आणि अध्यात्मिक केंद्राच्या स्वरुपात पाहत असल्याचे मंत्री बॅरी यांनी सांगितले आहे.

अयोध्या नगरी निर्मितीचा प्रस्ताव

अमेरिकेतील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर संघटनेचे संस्थापक प्रेम भंडारी यांनी पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांच्यासमोर ‘अयोध्या नगरी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याचा उद्देश उत्तर अमेरिका आणि कॅरेबियन भाविकांसाठी एक अध्यात्मिक केंद्र निर्माण करणे आहे. प्रस्तावित केंद्राला एक ‘मिनी अयोध्ये’च्या स्वरुपात विकसित केले जाणार आहे.

रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे अनावरण

मे महिन्यात रामलल्लाच्या प्रतिकृतीचे अनावरण झाले होते. या आयोजनात 10 हजारांहून अधिक भाविकांनी भाग घेतला होता. हा कार्यक्रम प्रेम भंडारी आणि अयोध्या श्रीराम ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष अमित आलाघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित झाला होता.

Advertisement
Tags :

.