कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेची तयारी जोमाने

10:16 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्यापासून  यात्रेला प्रारंभ : बुधवारी रथोत्सव मिरवणूक

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावांची महालक्ष्मी देवी यात्रा मंगळवार दि. 16 रोजीपासून होणार आहे. नऊ दिवस ही यात्रा होणार असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. महालक्ष्मीदेवी यात्रा कमिटी गेल्या दोन महिन्यापासून यात्रेची तयारी करत असून यात्रा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेसाठी अगसगा येथून रथ आणण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसापासून या रथजोडणीचे काम ब्रम्हलिंग मंदिराच्या समोर सुरू आहे. रथ सुमारे साठ फूट उंच इतका असून बुधवारी गावात देवीची रथोत्सव मिरवणूक होणार आहे. गावात सर्वजण आपापल्या घरांना रंगरंगोटी करू लागले आहेत. यात्रेसाठी मित्रमंडळी व पै पाहुणे यांना आमंत्रण देणे अशा कामांमध्ये या गावातील नागरिक गुंतलेले आहेत. यात्रेच्या भोजनासाठी लागणारे साहित्य, कपडे आदींची खरेदी करण्यासाठी या  गावातील नागरिक बेळगाव शहराला येऊ लागले आहेत.

तब्बल तीस वर्षानंतर महालक्ष्मी देवी यात्रा होणार असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावी नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेला तरुण वर्गही आपापल्या गावांमध्ये दाखल झालेला आहे. बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व गटारींचे कामकाज करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या विशेष निधीमधून गल्ल्यांमध्ये काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गटारीमध्ये डास पसरू नयेत यासाठी औषधाची फवारणी करण्यात येऊ लागली आहे. प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात देवीच्या विराजमानासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अॅड. नामदेव मोरे, चांगदेव जाधव, यल्लाप्पा बेळगावकर, मारुती जाधव, श्रीरंग भास्कर, पुंडलिक जाधव, निंगाप्पा जाधव, परशराम भास्कर आदींनी रविवारी सकाळी रथाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच यात्रा कमिटीचे सर्व सदस्य यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article