फुटबॉल स्पर्धेत लव्हडेल स्कूलला विजेतेपद
झेवियरेट चषक आंतर शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा : सेंट झेवियर्स उपविजेता
बेळगाव : माळमाऊती येथील मानस फुटबॉल अकादमी आयोजित झेवियरेट चषक आंतर शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात लव्हडेल स्कूलने सेंट झेवियर्सचा 3-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. लव्हडेल शाळेच्या टर्फ मैदानावर सकाळी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने महिला विद्यालयाचा 1-0 गोल फरकाने पराभव केला. झेव्हियर्सतर्फे अबुजर तिगडीने एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात लव्हडेल स्कूलने मराठी विद्यानिकेतनचा 3-0 असा पराभव केला. लव्हडेल संघाच्या हुसेन जमादारने 2, हसन जमादारने 1 गोल केला. अंतिम सामन्यात लव्हडेल स्कूलने सेंट झेवियर्स शाळेचा 3-0. असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. लव्हडेल संघातील हुसेन जमादार, लुकमन, हसन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे सोहल संगोळी, सुनील पाटील मॅन्युअल डिव्रुझ, बसवराज अक्षयमनी, नौशाद जमादार, चंद्रकांत पाटील, मानस नायक, यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू मानव शिंदे, सेंट झेवियर्स, उत्कृष्ट स्ट्रायकर-लुकमन लव्हडेल, उत्कृष्ट डिफेन्डर-अनिकेत पाटील सेंट झेवियर्स, उत्कृष्ट मिडफिल्ड-प्रज्वल कितुर मराठी विद्यानिकेतन, उत्कृष्ट गोलरक्षक-आरूष कडोलकर महिला विद्यालय, अंतिम सामन्यातील सामनावीर-आबुजर तिगडी, शिस्तबद्ध संघ सेंट फ्रान्सिस डि सेल स्कूल उचगांव, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हुसेन जमादार यांला सायकल देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच इम्रान बंदार, किरण के अमन सय्यद, ताहीर बेपारी, आदर्श गणेशकर, वसुंधरा चव्हाण किंजल जाधव, साक्षी चिटगी, श्रावणी सुतार, प्रांजल हजारे, श्र्रद्धा पाटील, सेजल तेजल हंसी उपस्थित होते.