For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुतगा कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात

10:04 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुतगा कुस्ती मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात
Advertisement

बेळगाव : मुतगा येथे हनुमान यात्रेनिमित्त हनुमान कुस्तीगीर संघटना मुतगा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन दमनी तलाव मुतगे येते करण्यात आले आहे असून या मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जास्तीत जास्त कुस्ती शौकिनांना बसण्याची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्र केसरी किरण भगत व जागतिक कुस्ती चॅम्पियन आशिष हु•ा यांच्यात होणार असून किरण भगत व आशिष हु•ा यांची मुतग्यात प्रथमच कुस्ती जोडण्यात आली आहे. दोघेही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असून कोण जिंकणार याची कुस्ती शौकिनांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.  दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हरियाणाच्या अनुज कुमार लिलू आखाडा यांच्या, तिसरा क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार व बाळू अपराध सांगली यांच्या, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार कार्वे कंग्राळी व समाधान गरुड पुणे, पाचव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व संजू इंगळगी दर्गा, सहाव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंग्राळी व ऋषिकेश देवकाते, सातव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व सुरेश रुपनर सांगली, आठव्या क्रमांकाची कुस्ती गुत्तप्पा दावणगिरी  व कार्तिक इंगळगी दर्गा, नव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वी कंग्राळी व गौस कुंदरर्गी दर्गा, दहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश तीर्थकुंडे व हनुमंत गंदीगवाड यांच्यात होणार आहेत. कुस्ती मैदान तयार करण्यासाठी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व ज्येष्ठ मल्ला भावकाण्णा पाटील, आण्णाप्पा बस्तवाड, जयसिंग पाटील, नामदेव पाटील, सयाजी पाटील, सातेरी पाटील, तुकाराम पाटील, जानबा पाटील, जोतिबा केदार, श्रीकांत पाटील, कृष्णा शिंदोळकर, विलास पाटील, मनोहर कडेमणी, शंकर पाटील, अनिल कडेमणी व कुस्ती संयोजन समितीचे सचिव नवीनकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.