For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लाहौर 1947’मध्ये प्रीति झिंटा

06:38 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लाहौर 1947’मध्ये प्रीति झिंटा
Advertisement

सनी देओल असणार मुख्य भूमिकेत

Advertisement

गदर 2 या चित्रपटाला मिळालेल्या अपार यशानंतर सनी देओलची कारकीर्द पुन्हा चमकली आहे. आगामी काळात सनी देओल अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. सनीच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘लाहोर 1947’चे नाव सामील आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान तर दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहेत. या चित्रपटाच्या नायिकेचे नाव आता समोर आले आहे.

घातक, घायल यासारखे हिट चित्रपट दिलेल्या राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांची जोडी आता ‘लाहौर 194’द्वारे पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाची नायिका म्हणून प्रीति झिंटाचे नाव चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती देखील बॉलिवूडमध्ये पुनरागमन करू शकते.

Advertisement

यापूर्वी प्रीति आणि सनी यांची जोडी ‘द हिरो, फर्ज आणि भइया’ या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. लाहौर 1947 मध्ये प्रीति दिसून आल्यास तिच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. तर दुसरीकडे आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Advertisement
Tags :

.