कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गर्भवती महिलांनो सावधान..!

11:11 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑनलाईन भामट्यांकडून फसवणुकीची शक्यता

Advertisement

बेळगाव : ऑनलाईन भामट्यांनी आता गर्भवती महिलांना आपले लक्ष्य बनविण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून देण्यात येणारे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार असून फोन पे किंवा गुगल पे शी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक किंवा क्युआर कोड द्यावा. तातडीने पैसे जमा केले जातील, असे सांगून गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील पैसे परस्पर उचलण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे. त्यामुळे अशा फोन कॉल्सना महिलांनी बळी पडू नये, असे आवाहन जाणकारांतून केले जात आहे.

Advertisement

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे गंडवले जात आहे. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलला आपली कोणतीही माहिती देऊ नये. यासाठी सायबर पोलिसांकडून समाजात जनजागृती केली जात आहे. आता गर्भवती महिलांना गंडविण्याचा प्रकार सुरू झाला आहे. गर्भवती महिलांना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मातृपूर्ण योजनेंतर्गत बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यानुसार आम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहोत, यासाठी गुगल पे किंवा फोन पेला संलग्न असलेला मोबाईल क्रमांक किंवा स्कॅनर पाठवा, असे सांगितले जात आहे.

विश्वास बसावा यासाठी चक्क अंगणवाडी शिक्षिकांचे नाव देखील सांगितले जात आहे.त्यामुळे हा प्रकार पाहता अंगणवाडी शिक्षिकांकडे असलेला गर्भवती महिलांचा डाटा लिक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण गर्भवती महिलांनी अंगणवाडी शिक्षिकांकडे दिलेल्या मोबाईल क्रमांकासह संबंधित महिलेचे व तिच्या पतीच्या नावांचा उल्लेख करत भामटे फोन करत आहेत. अंगणवाडी शिक्षिकेचे नाव सांगितले जात असल्याने बहुतांश जण भामट्यावर विश्वास ठेवून माहिती सांगत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article