महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पावसाळी साहित्य खरेदीला पसंती

10:58 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मान्सून तोंडावर : छत्री, रेनकोट, प्लास्टिकची खरेदी

Advertisement

बेळगाव : मान्सून तोंडावर आल्याने बाजारात पावसाळी साहित्याला मागणी वाढू लागली आहे. विशेषत: छत्री, रेनकोट, जॅकेट्स, प्लास्टिक कागद, चप्पल आदींची खरेदी होऊ लागली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळी साहित्य खरेदीची लगबग पाहावयास मिळत आहे. शहरातील मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडी बाजार, शनिवार खुट, काकतीवेस, नरगुंदकर भावे चौक आदी ठिकाणी पावसाळी साहित्याची विक्री होऊ लागली आहे. महिला आणि वयस्करांकडून छत्री तर दुचाकी वाहनधारकांकडून रेनकोटची खरेदी होऊ लागली आहे. त्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्री आणि रेनकोट खरेदी केले जात आहेत. बाजारात छत्री, रेनकोट, टोप्या, प्लास्टिकचे चप्पल आणि कागद मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी छत्री आणि रेनकोटची खरेदी केली जात आहे. यामध्ये काळ्या आणि विविध रंगांमध्ये छत्र्या आणि रेनकोट उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट दाखल झाले आहेत. लहान बालकांसाठी कार्टुनचे प्रिंट असलेले रेनकोटही पाहावयास मिळत आहेत. 100 ते 800 रुपयांपर्यंत त्यांचे दर आहेत. गतवर्षी पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. ऑगस्टनंतर पाऊस कमी झाला होता. त्यामुळे पावसाळी साहित्याची जास्त गरज भासली नाही. मात्र, यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांना छत्री, रेनकोट आणि जॅकेटची गरज भासणार आहे.

Advertisement

प्लास्टिक कागदाची शेतकऱ्यांकडून खरेदी 

गवतगंजी आणि झोपडीवर झाकण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्लास्टिकच्या कागदाची खरेदी होऊ लागली आहे. आकारमानानुसार या प्लास्टिक कागदाचे दर वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यात शेतकरी डोक्यावर प्लास्टिक कागद घेतात. या खोळ कागदांची मागणी वाढू लागली आहे. 30 ते 60 रुपये असा या खोळ कागदाचा दर आहे. त्याचबरोबर विविध वाहनांवर झाकण्यासाठी कागदांची मागणीही वाढत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article