प्रीती पवारचा विश्वविजेत्या हुआंगला धक्का
अऊंधती चौधरी, परवीन हुडाचेही चमकदार पुनरागमन
वृत्तसंस्था/ग्रेटर नोएडा
जागतिक बॉक्सिंग कप फायनलच्या सुवर्णपदकासाठीच्या लढतीत प्रवेश करताना उदयोन्मुख भारतीय बॉक्सर प्रीती पवारने ऑलिंपिक पदक विजेती आणि तीन वेळची विश्वविजेती चिनी तैपेईच्या हुआंग हसियाओ-वेनला धक्का दिला, तर अऊंधती चौधरी आणि परवीन हुडा यांनी मंगळवारी येथे परस्परविरोधी विजय नोंदवत यशस्वी आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले.
मीनाक्षी हुडा (48 किलो), नुपूर (80 किलोहून अधिक), अंकुश फांगल (80 किलो), अभिनाश जामवाल (65 किलो) आणि नरेंद्र बेरवाल (90 किलोंहून अधिक) यांनीही आपापल्या वजन गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रतिभावान प्रीतीने (54 किलो) अनुभवी हुआंगला लय मिळवू दिली नाही आणि विद्यमान विश्वविजेत्यावर 4-0 असा वर्चस्व दाखवून देणारा विजय मिळविला.
मनगटाच्या दुखापतीमुळे दीड वर्षांच्या आंतरराष्ट्रीय विश्रांतीनंतर परतलेली माजी जागतिक युवा विजेती अऊंधतीला कोणताही त्रास जाणवला नाही. तिने 70 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत जर्मनीच्या विश्वचषक पदक विजेत्या लिओनी मुलरवर तिसऱ्या फेरीत आरएससीवर (पंचानी थांबविलेली लढत) विजय मिळवला. तिने पहिल्या दोन फेरीत आक्रमकता दाखवत वर्चस्व गाजवले. दुसऱ्या फेरीत एकदा जर्मन खेळाडूला गारद केले आणि तिसऱ्या फेरीत पुन्हा तिला गारद करून शुद्ध विजय मिळवला.
2023 च्या आशियाई खेळांनंतर आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत असलेली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती परवीनने 60 किलो वजनी गटात पोलंडची जागतिक रौप्यपदक विजेती रायगिल्स्का अनेता एल्झबिएटावर 3-2 असा सहज विजय मिळवला. 12 महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा आपले स्थळ नमूद करण्यात आलेल्या अपयशामुळे परवीनवर बंदी घालण्यात आली होती. विद्यमान विश्वविजेत्या मिनाक्षीनेही तिची मजबूत वाटचाल चालू ठेवली आणि कोरियाच्या बाक चो-रोंगवर 5-0 असा व्यापक विजय मिळवला. तिने संपूर्ण लढतीवर नियंत्रण ठेवले, कधीही तिच्या प्रतिस्पर्ध्याला पाय रोवून उभे राहू दिले नाही. दुसरीकडे, अंकुशने आणखी एक प्रभावी 5-0 असा विजय मिळवला.