कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादावर आचूक वार

06:39 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हे अभियान 2019 च्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर भारताची सर्वात निर्णायक आणि विस्तृत कारवाई असल्याचे मानले जात आहे. सैन्याचे हे अभियान 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबविण्यात आले, या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हात होता. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची मुखवटा संघटना द रेजिस्टेंस फ्रंटने स्वीकारली होती.

Advertisement

Advertisement

अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आधुनिक आणि दूरपर्यंत मारा करणाऱ्या शक्तिशाली शस्त्रांचा वापर केला. यात स्काल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर बॉम्ब, लोइटरिंग म्युनिशन आणि राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. स्काल्प क्षेपणास्त्र 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत अचूक हल्ला करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूचे तळ नष्ट करण्यासाठी डागण्यात आले. हॅमर स्मार्ट बॉम्ब मजबूत इमारती आणि बंकर्स नेस्तनाबूत करण्यास सक्षम असून याचा मारक पल्ला 50-70 किलोमीटरपर्यंत आहे. तर लोइटरिंग म्युनिशन आत्मघाती ड्रोन असून तो शत्रूच्या क्षेत्रात उ•ाण करत लक्ष्याची ओळख करत आत्मघाती हल्ले करतो. याचा वापर देखरेख आणि अंतिम वार स्वरुपात करण्यात आला.

भारताचा अचूक प्रहार

भारताने या अचूक हल्ल्यात एकूण 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले, यातील 4 पाकिस्तानातील तर 5 पीओकेतील होते. पाकिस्तानी सैन्याच्या कुठल्याही तळाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. तर दहशतवादी संघटनांच्या कारवायांशी संबंधित स्थळांनाच टार्गेट करण्यात आल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

9 ठिकाणांची निवड

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवत भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळ अन् केंद्रांना नष्ट केले आहे. हा ‘फोकस्ड स्ट्राइक’ दहशतवादी कारवायांच्या मूळांवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला होता असे संरक्षण मंत्रालयाने वक्तव्य जारी करत स्पष्ट केले आहे. या हल्ल्यांच्या माध्यमातून भारताने सीमापार दहशतवादाला बळ पुरविणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

भारताकडून ज्या 9 स्थळांना लक्ष्य करण्यात आले, ते दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे प्रमुख प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक केंद्र होते. या ठिकाणांवरून भारतात दहशतवादी घुसखोरी, शस्त्रास्त्रांचा पुरवठा, ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि दारूगोळ्याची तस्करी केली जात होती.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article