For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राथमिक शाळांमधील अतिथी शिक्षकांना दसऱ्यापूर्वी मानधन

10:56 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्राथमिक शाळांमधील अतिथी शिक्षकांना दसऱ्यापूर्वी मानधन
Advertisement

माध्यमिक शिक्षकांना अजून काही दिवस करावी लागणार प्रतीक्षा

Advertisement

बेळगाव : सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने तात्पुरत्या स्वरुपात अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. परंतु मागील तीन महिन्यांपासून अतिथी शिक्षकांचे मानधन देण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील अतिथी शिक्षकांच्या मानधनासाठी 249 कोटी रुपये निधी राखीव ठेवल्याने या शिक्षकांना दसऱ्यापूर्वी मानधन मिळणार आहे. राज्यात यावर्षी एकूण 45 हजार शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. प्राथमिक शाळांसाठी 35 हजार तर उच्च माध्यमिक शाळांसाठी 10 हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. प्राथमिक विभागातील शिक्षकांना 10 हजार रुपये तर माध्यमिक विभागातील शिक्षकांना 10,500 रुपये मानधन निश्चित करण्यात आले. जून अखेरपासून अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.

अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अतिथी शिक्षकांना मानधन मिळाले नव्हते. दरवर्षी अतिथी शिक्षकांना दोन-तीन महिन्यांतून एकदा मानधन दिले जाते. मात्र, यावर्षी तीन महिने उलटले तरी मानधन देण्यात न आल्याने शिक्षकांना कुटुंब चालविणे कठीण झाले होते. त्यामुळे अतिथी शिक्षकांमधून मानधनाची मागणी केली जात होती. राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील अतिथी शिक्षकांच्या मानधनासाठी 249 कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु अद्याप हायस्कूलमधील अतिथी शिक्षकांच्या मानधनाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे दसऱ्यापूर्वी प्राथमिक अतिथी शिक्षकांचे मानधन मिळणार असले तरी हायस्कूल शिक्षकांना मात्र अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.