टेबल आढावा पूर्ण झाला तर आता उपवनसंरक्षकांनी हत्तीबाधित गावात यावे
प्रवीण गवस यांची मागणी , ८ दिवसात ग्रामपंचायत निहाय दौरा करा ; अन्यथा उठाव होईल
दोडामार्ग - वार्ताहर
सावंतवाडी उपवनसंवरक्षक मिश्रा हे नियुक्त होऊन अनेक दिवस उलटले मात्र त्यांचा टेबल आढावाच सुरु आहे. इकडे तिलारी खोऱ्यासह तळकट पंचक्रोशीत हत्ती प्रश्न सुरूच आहे त्यामुळे त्यांनी येत्या आठ दिवसात हत्ती बाधित ग्रामपंचायत निहाय दौरा करावा अन्यथा जनतेतुन तीव्र उठाव केला जाईल असे सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले. श्री. गवस माध्यमांना माहिती देताना पुढे म्हणाले, आपण तिलारी खोऱ्यासह दोडामार्ग तालुक्याच्या हत्ती प्रश्नावर अनेक वेळा आंदोलने केली त्यात अनेक आश्वासने मिळाली ती पूर्ण होण्याअगोदर अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या. नवनियुक्त उपवनसंवरक्षक मिश्रा यांनी चार्ज घेतल्यानंतर अनेक दिवस झाले ते प्रत्यक्ष हत्ती बाधित गावात येऊन प्रश्न जाणून घेतील अशी अपेक्षा होती मात्र सुरुवातीलाच त्यांनी निराशा केली. एवढे दिवस टेबलवरील फाईल चाळून झाल्या असतील तर हत्ती बाधित क्षेत्रात जी आश्वासने त्यांच्या पदावरून संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ती पूर्ण करण्यासाठी काय कार्यवाही करणार याबाबत शेतकरी, ग्रामस्थांना संवाद साधून कळवावे अशी मागणी श्री. गवस यांनी केली आहे.