कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राच्या बॉक्सिंगची धुरा प्रवीण दरेकरांकडे

06:32 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/  मुंबई

Advertisement

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर हे बहुमतांनी विजयी झाले आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये दरेकरांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत अध्यक्ष, 16 उपाध्यक्ष, महासचिव, खजिनदार, कार्यकारी सचिव, व्यवस्थापकीय सदस्य आणि विभागीय सचिव या महत्त्वाच्या पदांसाठी निवड प्रक्रिया झाली आहे.

Advertisement

दरम्यान, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची वार्षिक निवडणूक धर्मादाय आयुक्त कार्यालय, वरळी, मुंबई येथे पार पडली. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया धर्मादाय आयुक्त तथा निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झाली. खजिनदार पदासाठी नाशिकचे मनोज पिंगळे हे बिनविरोध निवडून आले आहेत. विभागीय सचिव या पदासाठी एकूण आठ जागा असून त्यापैकी सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. त्यात नाशिकचे मयूर बोरसे, कोल्हापूरचे मंगेश कराळे, लातूरचे अॅड संपत साळुंखे, छत्रपती संभाजीनगरचे अरुण भोसले, पुण्याचे विजयकुमार यादव आणि अमरावतीचे विजय गोटे यांचा समावेश आहे.

अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि रणजीत सावरकर यांच्यात थेट लढत

निवडणुकीकडे राज्याच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागलेले होते. अखेर यामध्ये दरेकर यांनी बाजी मारताना दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे, कार्यकारी सचिव या पदासाठी शैलेश ठाकूर, सविता बावनथडे आणि प्रशासकीय सचिव पदासाठी महेश सकपाळ व नीलम पाटील यांच्यात लढत झाली. उपाध्यक्ष पदासाठी एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात पंकज भारसाखळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंके, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, शेख गफ्फार अकबर, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, शाहुराज बिराजदार, अरुण बुटे, जयप्रकाशप दुबळे, अमर भंडारवार, नीलम पाटील, गोपाल देवांग, राजाराम दळवी, विजय सोनावणे यांच्यात लढत झाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article