प्रताप, किरण, व्यंकटेश आशियाई स्पर्धेसाठी पात्र
भूतान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शरीरसौष्ठवपटूंची निवड
बेळगाव : थिंपू-भूतान येथे होणाऱ्या साऊथ आशियाई शरीरसौष्ठव व फिजीक्स स्पोर्ट्स स्पर्धेसाठी बेळगावच्या तीन शरीरसौष्ठवपटूंची निवड झाली असून ते जून दरम्यान भूतानला रवाना होणार आहेत. या खेळाडूंचा संघटनेतर्फे गौरव करण्यात आला. बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे शरीरसौष्ठवपटू प्रताप कालकुंद्रीकर, किरण वाल्मिकी व व्यंकटेश ताशिलदार यांची भूतान येथे होणाऱ्या साऊथ आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. उद्योजक दिलीप चिटणीस व शिरीश गोगटे यांच्याकडून या खेळाडूंना आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा संघटनेच्यावतीने सदर स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या तिघांचा बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, दिलीप चिटणीस, शिरीश गोगटे, अजित सिद्दण्णावर, गंगाधर एम., सुनील राऊत, बसवराज अरळीमट्टी व सुनील पवार यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पगडी देवून गौरविण्यात आले.