वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद कोदे
सावंतवाडी । प्रतिनिधी
वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद कोदे, सचिव पदी अण्णा म्हापसेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैश्यवाडा येथील श्री काडसिद्धेश्वर महाराज मठात दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वैश्यवाड्यातील नागरिकांच्या बैठकीत दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.या बैठकीत बोलताना मावळते अध्यक्ष दीपक म्हापसेकर यांनी दोन वर्षाच्या काळात सर्वांचे सहकार्य मिळाल्याने चांगले काम करू शकलो असे सांगून नवीन कमिटीस शुभेच्छा दिल्या. मंदिर समितीचे विश्वस्त विकास सुकी राहणार असून यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारीणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष -प्रसाद कोदे ,
उपाध्यक्ष -मिलिंद सुकी,
सचिव -अण्णा म्हापसेकर,
सहसचिव -संकेत शिरसाट,
खजिनदार संजय म्हापसेकर,
सहखजिनदार -महेश म्हापसेकर
सदस्य :
प्रथमेश टोपले
रुपेश कुडतरकर
ओंकार कोदे
केतन कालेलकर
गजानन सुकी
अक्षय म्हापसेकर
प्रथमेश सुकी
सौं गीता सुकी
सौं अस्मिता नेवगी
सल्लागार:
सौं विद्या सुकी
दीपक म्हापसेकर
आनंद नेवगी
सतीश नार्वेकर या बैठकीला वैश्यवाडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.