प्रणॉयची विजयी सलामी, सेन पराभूत
वृत्तसंस्था / चेंगझोयु (चीन)
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या चायना खुल्या सुपर 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच. एस. प्रणॉयने पुरुष एकेरीत विजयी सलामी देताना जपानच्या वाटांबेचा पराभव केला. मात्र लक्ष्य सेनचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची आपले आव्हान जीवंत राखण्यासाठी खरी कसरत राहील.
35 व्या मानांकित एच. एस. प्रणॉयने पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या कोकी वाटांबेचा 8-21, 21-16, 23-21 अशा गेम्समध्ये पराभव करताना 5 मॅच पॉईंट वाचविले. या लढतीत प्रणॉयने पहिला गेम गमविल्यानंतर पुढील दोन गेम्समध्ये दर्जेदार आणि अचूक खेळ करत विजय नोंदविला. दुसऱ्या एका सामन्यात चीनच्या पाचव्या मानांकीत ली फेंगने भारताच्या लक्ष्य सेनचे आव्हान 14-21, 24-22, 21-11 अशा गेम्समध्ये संपुष्टात आणले. या लढतीत लक्ष्य सेनने पहिला गेम जिंकून फेंगवर आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर त्याला फेंगने आपल्या स्मॅश फटक्यावर वारंवार चुका करण्यास भाग पाडले आणि अखेर या लढतीत लक्ष्यला हा पत्करावी लागली.
महिलांच्या एकेरीतील पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या अनुपमा उपाध्येयला हार पत्करावी लागली. चीन तैपेईच्या लीन हेसियांग ती हिने अनुपमाचा 21-23, 21-11, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्याच प्रमाणे भारताच्या ए. सूर्या व ए. प्रमुतेश त्याच प्रमाणे रोहन कपूर व ऋत्विका ग•s यांचे मिश्र दुहेरीतील आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले.