For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रणव काळगे कलाश्री सोडतीचे भाग्यवान विजेते

06:23 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रणव काळगे कलाश्री सोडतीचे भाग्यवान विजेते
Advertisement

9 व्या सोडतीत पंचवीस हजारांच्या दामदुप्पट ठेव पावतीचे मानकरी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

उद्यमबाग येथील कलाश्री बंब अँड स्टील फर्निचरच्या 9 व्या सोडतीचे गांधीनगर, बेळगावचे प्रणव आर. काळगे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना कलाश्री सोसायटीची 25 हजारांची दामदुप्पट ठेव पावती बक्षिसादाखल देण्यात आली.

Advertisement

कलाश्री उद्योग समूहचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यक्रमात पीएलडी बँकेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते अॅड. शंकर नावगेकर, माधुरी जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव, इनामदार हॉस्पिटलच्या साहाय्यक डॉ. स्वाती खंडागळे, मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे अध्यक्ष रमेश देसूरकर, सामाजिक कार्यकर्त्या संगीता अगनोजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुऊवात झाली. मान्यवरांचा भेटवस्तू व पुष्प देऊन  सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त करताना कलाश्री उद्योग समुहाने सामाजिक बांधिलकी जपत प्रगती करून सामान्य जनतेची स्वप्नपूर्ती केली आहे. लोकांना बचत करून आपल्या गरजा कशा पूर्ण करता येतील हे कलाश्री दालन व सोसायटी माध्यमातून दाखवून दिले आहे. त्याचा लाभ घ्या, असे आवाहन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वेळेत उपस्थित भाग्यवान ग्राहकांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ड्रॉ काढून विजेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्वाती आजरेकर (हिंडलगा), नीता मालनी (ब्रम्हनगर), मनोहर पाटील (खादरवाडी) व आकाश कट्टीमनी (टिळकवाडी) यांचा समावेश होता. त्यानंतर मुख्य ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये बंपर विजेते प्रणव आर. काळगे ठरले. या व्यतिरिक्त चार इंडक्शन शेगडीचे विजेते वृद्धांश कुरणे (बेळगाव), शिल्पा पाटील (मच्छे), शंकर मेलगे (मास्केनहट्टी) व द्रौपदी मोटणकर चेतन (नावगे) भाग्यवान ठरले. यावेळी कलाश्री सोसायटीत ठेव ठेवलेल्या ग्राहकांचाही सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी अॅड. शंकर नावगेकर हे ऊ. 9600 भरून कलाश्री योजनेचे सभासद झाले. उपस्थित ग्राहकांना देशी मसूर, साखर, चहा पावडर व अन्य वस्तूवर भरघोष सुट तसेच रु. 500 वरील खरेदीला 2 किलो तांदूळ भेटी दाखल देण्यात आले. कार्यक्रमाला ग्राहक, डीलर्स, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी तर आभार पवार सर यांनी मानले.

Advertisement
Tags :

.