महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जागतिक स्वरुप!

06:14 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबियासह विविध देशांमध्ये अयोध्येतील कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोमवार, 22 जानेवारीला होणार आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या सोहळ्याबाबत जल्लोषाचे वातावरण आहे. जगातील 50 हून अधिक देशांमध्ये रामलल्ला यांचा जीवन अभिषेक कार्यक्रम थेट दाखवण्याची आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, पॅनडा यांसारख्या अनेक देशांमध्ये मंदिरांमधील पूजा समारंभ, मिरवणुका आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम थेट दाखवले जाणार आहेत. जगातील जवळपास 160 देशांमध्ये हिंदू धर्मीय लोक मोठ्या प्रमाणात राहत असून या सर्व देशांमध्ये हा सोहळा ‘लाईव्ह’ दाखविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विश्व हिंदू परिषदेने जगभरातील देशांमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्याची योजना तयार केली आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासंबंधी बोलताना विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. जगातील 160 देशांमध्ये जिथे हिंदू राहतात तिथे कार्यक्रम आयोजित केले जातील. जगातील 50 हून अधिक देशांमध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील. तेथील लोकांनी केलेल्या मागणीनुसार प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम तेथे थेट दाखवण्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बऱ्याच देशांमध्ये भव्य-दिव्य पूर्वतयारी

अमेरिकेतील 300, ब्रिटनमध्ये 25, ऑस्ट्रेलियातील 30, पॅनडामध्ये 30, मॉरिशसमध्ये 100 व्यतिरिक्त आयर्लंड, फिजी, इंडोनेशिया आणि जर्मनी सारख्या 50 हून अधिक देशांमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे कार्यक्रम भव्य स्वरुपात आयोजित केले जात आहेत. तेथील शहरातील मंदिरांमध्ये मिरवणूक, हवन पूजा, हनुमान चालीसा पठण आणि प्राणप्रतिष्ठा यांचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची तयारी सुरू आहे.

विदेशातील महनीयांनाही निमंत्रण

जर्मनीसारख्या देशांमध्ये जेथे टाइम झोननुसार वेळ अनुकूल आहे, तेथे सोहळा थेट पाहिला जाईल. अमेरिकेसारख्या देशात जेथे टाइम झोन सुसंगत नाही, तेथे मंगला आरतीचा कार्यक्रम एकत्रितपणे दाखविण्याचा पर्याय असल्याचे आलोक कुमार यांनी सांगितले. प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमेरिका, पॅनडा, जर्मनी, फिजी अशा 50 देशांच्या प्रतिनिधींनाही अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याचेही ते पुढे म्हणाले.

घरोघरी पोहोचल्या अक्षता

भारतातील 10 कोटींहून अधिक कुटुंबांच्या घरी अक्षता पोहोचवण्यात येत आहेत. आमचे 5 लाख ठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंगचे टार्गेट होते, परंतु आता त्यापेक्षा जास्त ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याचे दिसते, असेही आलोक कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच निमंत्रणावरून सुरू असलेल्या वादासंबंधी भाष्य करताना त्यांनी विरोधकांना फटकारले. आगामी निवडणुकांमुळे हे लोक संभ्रमात असून अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी बेताल वक्तव्ये करत आहेत. यावर आपण अधिक भाष्य करणार नाही, असे ते पुढे म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article