प्रमोद पालेकर अकादमीकडे अलाबल चषक
11:17 AM Dec 10, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
प्रत्युत्तरादाखल खेळताना शेट्टी लायाज संघाने सर्व गडी बाद 88 धावा केला. विश्वनाथ, आयुष यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. पालेकरतर्फे शनव धोंडने दोन तर नदाफ, लक्ष्यम, श्लोकने प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मुर्गेश अलबाल, रोहित मंडळ, हेमंत लेंगडे, साईश धोंड, प्रमोद पालेकर, मनोहर होसुरकर यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेता संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तुफान नदाफ सामनावीर-पालेकर अकादमी,राजवीर टी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक-प्रमोद पालेकर, प्रथम अलाबाल उत्कृष्ट फलंदाज-पालेकर अकादमी, श्लोक उत्कृष्ट गोलंदाज-पालेकर अकादमी, संग्राम पाटील मालिकावीर -केआर शेट्टी लायाज. स्पर्धेसाठी पंच म्हणून आकाश असलकर, प्रवेश पाटील यांनी काम पाहिले.
Advertisement
संग्राम पाटील मालिकावीर, तुफान नदाफ सामनावीर
Advertisement
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमी आयोजित एस. बी. अलाबाल चषक 10 वर्षाखालील अंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अपॅडमीने के. आर. शेट्टी लायाजचा 35 धावांनी पराभव करून एस. बी. अलाबाल चषक पटकाविला. संग्राम पाटील मालिकावीर, तुफान नदाफ सामनावर ठरले. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती झालेल्या अंतिम सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 123 केल्या. प्रथम अलाबलने 28, तुफान नदाफने 23, शहाण मंडल 22 तर शनव धोंडने 13 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे संग्राम पाटीलने 2, तर आयुष देसाईने एक गडी बाद केला.
Advertisement
Advertisement
Next Article