For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमोद भगतला दोन सुवर्णपदके

06:20 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रमोद भगतला दोन सुवर्णपदके
Advertisement

वृत्तसंस्था / व्हिक्टोरिया

Advertisement

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 2025 च्या ऑस्ट्रेलियन पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पॅराबॅडमिंटनपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने दोन सुवर्णपदकांची तर सुकांत कदमने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकाविले.

पुरूष एसएल-3 गटातील एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतने आपल्याच देशाच्या मनोज सरकारचा 21-15, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदकाला गसवणी घातली. पुरूष दुहेरीत एसएल-3 व एसएल-4 गटातील अंतिम सामन्यात प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी अंतिम सामन्यात भारतीय जोडी उमेश विक्रमकुमार आणि सूर्यकांत यादव यांचा 21-11, 19-21, 21-18 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. प्रमोद भगतचे हे स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. पुरूष एकेरीत एसएल-4 गटात सुकांत कदमला अंतिम सामन्यात सूर्यकांतकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे कदमला रौप्य पदक मिळाले. सूर्यकांतने सुकांत कदमचा 23-21, 14-21, 21-19 असा पराभव केला.

Advertisement

भारताच्या मानसी जोशीने या स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. महिलांच्या एसएल-3 एकेरीत तसेच तिने मिश्र दुहेरीत एसएल-3-एसयु-5 गटात ही सुवर्णपदके मिळविली आहेत. मिश्र दुहेरीत मानसी जोशीने ऋतिक रघुपती समवेत सुवर्णपदक मिळविले आहे. ऋतिक रघुपती आणि चिराग बारेथा यांनी पुरूष दुहेरीत एसयु-5 विभागात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत भारताच्या शिवरंजन सोलाईमालाई आणि सुदर्शन मुथुस्वामी यांनी पुरूष दुहेरीत एसएच-6 गटात सुवर्णपदक, यशोधन रावनकोले आणि धिरज सैनी यांनी पुरूष दुहेरीत एसयु-5 गटात सुवर्णपदक तर महिलांच्या एकेरीत एसएल-4-एसयु-5 गटात सुवर्णपदक मिळविताना ऑस्ट्रेलियाच्या गनसनचा पराभव केला.

Advertisement
Tags :

.