For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमोद भगतला सुवर्ण, रौप्य

06:28 AM Sep 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रमोद भगतला सुवर्ण  रौप्य
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2025 च्या चायना पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य तसेच सुकांत कदमने 2 रौप्य पदकांची कमाई केली.

या स्पर्धेत अनुभवी प्रमोद भगतने पुरुषांच्या एसएल-3 एकेरीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या अल इमरानचा 2-15, 21-19, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. तब्बल 18 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रमोद भगतने आपल्या पुनरागमनातच सुवर्णपदक घेतले आहे. प्रमोद भगतला पॅरीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा हुकली होती.

Advertisement

पुरुष दुहेरीच्या विभागात प्रमोद भगत आणि सुकांत कदम या जोडीने रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या जगदीश डिली आणि नवीन कुमार या भारतीय जोडीने भगत आणि कदम यांचे आव्हान 21-18, 20-22, 21-18 असे संपुष्टात आणत रौप्यपदक मिळविले. पुरुषांच्या एसएल-4 एकेरीमध्ये सुकांत कदमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारातील अंतिम सामन्यात फ्रान्सच्या लुकास मेझूरने सुकांतचा 21-9, 21-8 असा फडशा पाडला. 2020 च्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील कृष्णाने पुरुषांच्या एसएच-6 एकेरी प्रकारात रौप्यपदक घेतले. थायलंडच्या मेचाइने कृष्णाचा 20-22, 21-7, 21-17 असा पराभव केला.

Advertisement
Tags :

.