For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा संपन्न

05:12 PM Nov 10, 2025 IST | NEETA POTDAR
pandharpur   पंढरपुरात  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा संपन्न
Advertisement

                             श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी व मोत्यांचे अलंकार परिधान

Advertisement

पंढरपूर : कार्तिकी एकादशी रविवार, २ नोव्हेंबर रोजी झाली. रविवार, ९ नोव्हेंबर रोजी मुहूर्तानुसार श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा मंदिर समिती सदस्या अॅड. माधवी निगहे व शकुंतला नहगिरे यांच्या हस्ते झाल्याची माहिती प्रभारी  व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.

या पूजेच्या सुरवातीला प्र व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते श्रीस पहिले स्नान घालण्यात आले. तसेच श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, डिप्यथा कंगण जोह, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी २ पदरी, मोत्याची कंठी १ पदरी पदकास मोती, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, मत्स्य जोड, लक्ष्मी पदकासरु लॉकेट, तुळशीची माळ १ पदरी, शिरपेच लहान १० लोलक असलेला, शिरपेच मोठा २ लोलक असलेला, तोहे जोड, जवेची माळ २ पदरी, एकदाणी इत्यादी अलंकार परिषान करण्यात आले होते.

Advertisement

तसेच रुक्मिणी मातेस सोने मुकूट, बाक्य जोड, तानवह जोड, चिचपेटी, तांबडी, जवमानी पदक, लक्ष्मीहार, जवेच्या माळा, मोहरांची माळ, पुतळ्याची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, देवाचा शिणवटा थकवा चालविण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारती बेळी दाखविण्यात आला.

दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रीचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार २६ ऑक्टोबर रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी राजोपचार प्रश्नाळपूजेपर्यंत बंद ठेवून माविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून दिले होते.

आजपासून राजोपचार सुरू

आजपासून श्री विठ्ठलास व श्री रुक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इत्यादी राजोपचार सुरू करण्यात आले आहेत. - राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर

 

Advertisement
Tags :

.