महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिम पर्वत सर करणारी ‘प्रकृती’

10:42 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाहूनगरच्या अलगुडेकरचा अनोखा उपक्रम, अज्ञात हिम पर्वतावर उमटविला बेळगावचा ठसा

Advertisement

बेळगाव : आपला देश नानाविध रुपांनी नटला आहे. अनेक पर्यटक आपल्यापरीने देश फिरण्यासाठी जातात. भारताचे शिखर आणि मानबिंदू म्हणून आपण हिमालय पर्वताकडे पाहतो. याचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. मात्र त्याचे सौंदर्य पाहून ते प्रसन्न होतात. त्यावर चढाई करुन ते सर करणे तसे कठीणच. अशा परिस्थितीत एखाद्या अज्ञात हिम पर्वतावर चढाई करणे आणि तो सर करणे म्हणजे धोक्याची घंटा गळ्यात बांधण्यासारखेच आहे. मात्र बेळगाव-शाहूनगर येथील प्रकृती रमेश अलगुडेकर हिने एक अज्ञात हिम पर्वत सर केल्याने हा कौतुकाचा विषय बनला आहे.

Advertisement

एखाद्या ऋतुत वारंवार बदल होणे आणि अशा परिस्थितीत हिम पर्वत चढणे म्हणजे आपला जीव मुठीत घेवून जाणे होय. मात्र अशा परिस्थितीत यावर मात करत उन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता प्रकृतीने 6.068 मी.ची चढाई केली. यावेळी काही अंशी प्राणवायुही कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कठीण हिम पर्वत चढणे अशक्यच असते. त्यात एका मुलीने हिम पर्वत सर करणे म्हणजे बेळगावकरांच्या शिरपेचात तुरा रोवण्याचे काम प्रकृतीने केले. सलग 12 तास कोणताही आहार न घेता तिने हा पल्ला गाठला. दरम्यान हिम पर्वताच्या रांगामध्ये वारंवार होणारे हवामानाचे बदल अनेकांना नको करुन सोडते. मोठ्या चिकाटीने तिने हे साध्य केले आहे.

काही जण ज्या ठिकाणी पर्यटक जातात अशा ठिकाणीच हिम पर्वत चढाई करतात. मात्र प्रकृतीने एका अज्ञात हिम पर्वतावर चढाई केली आणि त्या ठिकाणी आव्हानात्मक परिस्थितीशी झुंज देत यश मिळविले. दरम्यान या हिम पर्वताचा शोध घेण्यासाठी त्यांचे परिश्रमही मोठे होते. या साऱ्यामध्ये तिच्या टीमचाही मोठा हातभार मिळाला. अशा ऋतुत तब्बल 8 जणांनी एकमेकांची साथ न सोडता हा पर्वत सरस केला. अन्न अथवा पाणी न ग्रहन करता ती व तिच्या साथीदारांनी ही कामगिरी फत्ते केली. यापूर्वीही अशाप्रकारच्या चढाया आम्ही केल्या आहेत.

मात्र हिम पर्वतच्या रांगामधील होणारे वारंवार बदल अनेकांची इच्छाशक्ती कमकुवत करते. अशा परिस्थितीत प्रकृतीने न डगमगडता हा पर्वत चढला. तब्बल 12 तास चढाई केल्यानंतर प्रकृतीने प्रकृतीशीच झुंज दिली. कोणतेही चुकीचे पाऊल जीवावर बेतणारे होते. पर्वत चढताना जो उत्साह होता. तो चढाईच्या थोड्या अंतरावर जाताच संपला. मात्र अशा परिस्थितीत कोणताही थकवा अथवा चूक न करता ज्यावेळी अज्ञात हिम पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. चढाई केल्यानंतर आपल्या देशाचा तिरंगा फडकवून आनंदही त्यांनी साजरा केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article