प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनच लढतील...संजय राऊतांचा खुलासा
प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे मित्रपक्ष असल्याने सहाजिकच ते महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहेत त्यामुळे सहाजिकत प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये मानाचं स्थान असेल. तसेच आंबेडकरांच्या इंडियातील प्रवेशासंदर्भात शरद पवार स्वत:हा प्रकाश आंबेडकरांशी बोलत असून त्यावर सकारात्मक तोडगा नक्कीच निघेल. अशी माहीती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा पारंपारिक मतदारसंघ असून तेथून तेच लढतील असेही त्यांनी जाहिर केले आहे.
आज मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागावाटपाच्य़ा मुद्द्यावर चर्चा चालु असल्याचे सांगितलं.
यावेळी ते म्हणाले, "मागिल काही वर्षापासून प्रकाश आंबडकर हे अकोल्यामधून लढत आहेत. अकोला हा त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. यावेळी ही ते तिथूनच लढतील कारण वंचित बहूजन आघाडी ही महाविकास आघाडीचा महत्वाचा भाग आहे.
काही गोष्टींवर निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक हे येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करणार नाहीत. कारण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला धोका पोहोचवण्याचं काम केलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडी मध्ये प्रवेशाची केवळ औपचारिकता राहीली असल्याचेही त्यांनी सांगितलं."