महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आता चेंडू ठाकरेंच्या कोर्टात! लोकसभा निवडणुकच्या जागावाटपावर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

04:05 PM Dec 06, 2023 IST | Abhijeet Khandekar
Prakash Ambedkar
Advertisement

वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवताना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवण्याची धमकी दिली. तसेच जागा वाटपासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी आता चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

“शिवसेना (ठाकरे गट) हा महाराष्ट्र विकास आघाडी (MVA) सोबत आहे. आमच्या आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. पण ठाकरे जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अडकले आहेत. आता चेंडू ठाकरेंच्या कोर्टात असून त्यांनी लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू.” असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Advertisement

2024 च्या लोकसभेच्या निवडणुकांचा ट्रेलर असणाऱ्या पाच राज्यांच्या निकालावर आंबेडकर यांनी भाष्य केले. मुंबईत माध्यमांशी बोलताना वंचित बहूजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, “प्रादेशिक पक्षाचा नेता संसदीय लोकशाहीत मुख्यमंत्री होऊ शकतो. तरीही भाजप- आरएसएस लोकशाहीचे अध्यक्षीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे देशातील संसदीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सर्व प्रादेशिक विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात एकवटले पाहिजे. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांनी प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला पाहिजे. लोकशाही टिकली तरच राजकीय पक्ष टिकतील.” असे सांगतान काँग्रेसने सर्व पक्षांसोबत आघाडी करून आश्वासक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असे ही त्यांनी काँग्रेसला सुनवले.

Advertisement
Tags :
PRAKASH AMBEDKARreactionseat allocation
Next Article