महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रज्ञानंद कार्लसनविरुद्ध पराभूत

06:09 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्टॅव्हेंगर (नॉर्वे)

Advertisement

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला नॉर्वेचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनविऊद्ध पराभव पत्करावा लागलेला असला, तरी त्यापूर्वी त्याने जोरदार लढत दिली. दुसरीकडे, त्याची थोरली बहीण आर. वैशालीने युक्रेनच्या अॅना मुझिचूकचा पराभव केला.

Advertisement

या विजयासह कार्लसनने फ्रान्सच्या फिरोजा अलिरेझाकडून पराभूत झालेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावरील आपली आघाडी पूर्ण गुणाने वाढवली आहे. दरम्यान, विश्वविजेत्या डिंग लिरेनची निराशाजनक कामगिरी कायम राहिलेली असून त्याला अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाकडून पराभव पत्करावा लागला.  सहा खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत फक्त दोन फेऱ्या बाकी असताना, कार्लसन 14.5 गुणांनिशी नाकामुरापेक्षा (13.5 गुण) पुढे आहे. 12 गुण झालेला प्रज्ञानंद तिसऱ्या क्रमांकावर असून तो अलिरेझापेक्षा पूर्ण गुणाने आघाडीवर आहे. काऊआना नऊ गुणांनिशी पाचव्या स्थानावर आहे, तर लिरेन 4.5 गुणांनिशी शेवटच्या स्थानावर आहे.

महिला विभागात चीनच्या विश्वविजेत्या वेनजून जूने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगवर मात करत 14.5 गुणांनिशी आघाडीवर जाण्यात यश मिळविले आहे. वैशालीविऊद्ध मुझिचूकच्या पराभवाचा तिला याकामी फायदा झाला. मुझिचूक 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून वैशाली आणि चीनच्या टिंगजी लेई यांच्यापेक्षा 1.5 गुणांनी पुढे आहे. लेईने कोनेरू हम्पीला पराभूत केले. आठ गुणांसह हम्पी क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून क्रॅमलिंगपेक्षा 3.5 गुणांनी ती पुढे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Sport
Next Article