For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार प्रज्ञा

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार प्रज्ञा

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल सध्या चर्चेत आहे. प्रज्ञा तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रज्ञा आता लवकरच एका मोठ्या हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. प्रज्ञा स्वत:च्या नव्या प्रोजेक्टवरून अत्यंत उत्साही दिसून येत आहे. अक्षय कुमारने स्वत:चा आगामी चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षयने आता ‘खेल खेल में’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. यात त्याच्यासोबत तापसी पन्नू देखील दिसून येणार आहे. अक्षयच्या या चित्रपटात प्रज्ञा जयस्वालची एंट्री झाल्याचे समजते. अक्षय कुमार आणि प्रज्ञाचा हा चित्रपट प्रसिद्ध इटालियन चित्रपट ‘परफेटी स्कोनोसियुटी’चा रिमेक असणरा आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी धाटणीचा असेल. प्रज्ञा सध्या उदयपूरमध्ये उर्वरित कलाकारांसोबत चित्रिकरण करतेय. तर या चित्रपटात अक्षय कुमार आणि फरदीन खान हे एकत्र दिसून येणार आहेत.  प्रज्ञा ‘खेल खेल में’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.