For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ञानंदची विदितवर मात, आर. वैशालीही विजयी

06:44 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ञानंदची विदितवर मात  आर  वैशालीही विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नेत्रदीपक खेळ करून विदित गुजराथीला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पराभूत केले. प्रज्ञानंद व वैशाली या दोन्ही भावंडांसाठी स्पर्धेतील हा दिवस चांगला ठरला. कारण आर वैशालीनेही महिला विभागातील एकमेव निकाल लागलेल्या लढतीत बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हावर या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

पुऊषांच्या विभागात डी. गुकेशने प्रगती करण्याचा प्रयत्न केला, परंतु रशियाच्या इयान नेपोम्नियाचीच्या भक्कम बचावाला तो भेदू शकला नाही आणि त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझानेही अमेरिकेच्या अव्वल मानांकित फॅबियानो काऊआनाविऊद्धचा सामना बरोबरीत सोडविला. अन्य एक अमेरिकन बुद्धिबळपटू हिकारू नाकामुराला अझरबैजानच्या निजात आबासोव्हविऊद्ध बरोबरी साधण्यात अडचण आली नाही.

Advertisement

महिला विभागात कोनेरू हम्पी हिने झोंगयी टॅनविऊद्ध पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना सहज बरोबरी साधली, तर चीनच्या टिनजी लेईने रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबतची लढत बरोबरीत सोडविली. अन्य एक रशियन खेळाडू कॅटेरिना लाग्नोने देखील युक्रेनच्या अॅना मुझिचुकला गूण वाटून घेण्यास भाग पाडले. आठ खेळाडूंच्या या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत 11 फेऱ्या अजून बाकी असून काऊआना, गुकेश आणि नेपोम्नियाची हे पुऊष गटात प्रत्येकी दोन गुणांनिशी सध्या आघाडीवर आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता गुजराथी आणि प्रज्ञानंद असून त्यांचे प्रत्येकी 1.5 गुण आहेत. नाकामुरा, अलिरेझा आणि आबासोव्ह हे आणखी अर्ध्या गुणाने मागे आहेत.

महिलांच्या विभागात झोंगी टॅन दोन गुणांसह जवळची प्रतिस्पर्धी गोर्याचकिना हिच्यापेक्षा अर्ध्या गुणांनी आघाडीवर असून हंपी, वैशाली, लगनो यांच्याही खात्यात प्रत्येकी 1.5 गुण आहे. लेई, मुझीचुक आणि सलीमोव्हा प्रत्येकी एका गुणासह सहाव्या स्थानावर आहेत.

Advertisement
Tags :

.