महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रज्ञानंदची गुकेशला चांगली झुंज, लढत बरोबरीत

06:55 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी (नेदरलँड्स)

Advertisement

टाटा स्टील मास्टर्सच्या आठव्या फेरीत ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने विश्वविजेत्या डी. गुकेशविरुद्ध चांगला खेळ करून सामना बरोबरीत सोडविला. पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना बर्लिन डिफेन्सचा वापर केलेल्या प्रज्ञानंदसाठी थोडीशी अनुकूल स्थिती होती, परंतु गुकेशने नेहमीच सतर्क राहून बचाव केला. प्रज्ञानंदने अनुकूलतेचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला असला, तरी हा सामना नेहमीच बरोबरीच्या जवळ राहिला. 33 चालींनंतर हा सामना बरोबरीत सुटला.

Advertisement

या बरोबरीमुळे प्रज्ञानंद आणि गुकेश हे दोघेही 5.5 गुणांसह आघाडीवर राहतील अशी शक्यता आहे. कारण रविवारी संयुक्तपणे आघाडीवर राहिलेला उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह देखील चौथ्या स्थानावर असलेल्या स्लोव्हेनियाच्या व्लादिमीर फेडोसेव्हविरुद्ध बरोबरीवर समाधान मानण्यास सज्ज झाला होता.

इतर भारतीयांमध्ये ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णने डच अनीश गिरीसोबत बरोबरी साधली. हरिकृष्णने चार गुण मिळवले असून अनीशचे सलग सातव्या बरोबरीनंतर 3.5 गुण झाले आहेत. दुसरीकडे, अर्जुन एरिगेसीने सर्बियाच्या अॅलेक्सी सरनासोबत बरोबरी साधली, तर लिओन ल्यूक मेंडोनसाने हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टविऊद्धही असाच निकाल साध्य केला. अर्जुन दोन गुणांसह मेंडोन्सापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article