For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी

12:39 PM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी
Advertisement

व्हाईस चेरमनपदी सौ साक्षी गावडे

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

विलवडे येथील छत्रपती शिवाजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलवडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही एकमताने निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणुन आर आर आरावंदेकर यांनी काम केले.यावेळी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रदीप दळवी यांची तर व्हाईसचेरमनपदी सौ साक्षी विलास गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल या दोघांचे सरपंच प्रकाश दळवी आणि पतसंस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन प्रदीप दळवी आणि व्हाईसचेरमन साक्षी गावडे यांनी पतसंस्थेच्या आर्थिक उन्नतीसह पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी विशेष योजना राबवण्यात असल्याचे सांगितले.यावेळी पतसंस्थेचे संचालक तथा माजी चेअरमन विलास गावडे, बाळकृष्ण दळवी, राजाराम दळवी, भागू लांबर, बुद्धभूषण हेवाळकर, प्रफुल्ल सावंत, पतसंस्थेचे व्यवस्थापक सोनू दळवी, लिपिक सदाशिव दळवी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.