महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संतुलित, निरोगी जीवनशैलीसाठी दररोज योग करा

03:37 PM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांचे आवाहन, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदतर्फे योग दिन साजरा

Advertisement

पणजी : संतुलित आणि निरोगी जीवनशैली साधण्यासाठी योग आणि आयुर्वेदाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनावरील योग आणि आयुर्वेदाचा प्रभाव वाढवण्यासाठी योग दिवस साजरा केला जातो. आरोग्य आणि आनंदासाठी सर्वांगीण दृष्टीकोन वाढवून, वेलनेस टुरिझमला एकत्रित करण्यासाठी गोवा एक परिपूर्ण गंतव्यस्थान आहे. पर्यटन विभाग एआयआयए,गोवा यांचा समावेश करून संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद आणि निरोगी पर्यटनाला चालना देईल. असे गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका यांनी नमूद केले आहे.

Advertisement

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए), गोवा यांनी एकता आणि कल्याणाचे सार आत्मसात करत 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. स्वास्थवृत्त विभाग  व योग आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ज्योती सरदेसाई,  ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गोवाच्या डीन प्रा.डॉ. सुजाता कदम यांच्यासह मान्यवर प्राध्यापक व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.

एआयआयए गोवा कॅम्पसमध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सौहार्दासाठी आवश्यक असलेल्या या प्राचीन पद्धतींचा प्रचार करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. पर्यटन विभागासोबत, आम्ही गोव्याला निरोगी आणि अधिक संतुलित जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणारे, वेलनेस टुरिझमसाठी एक अग्रगण्य स्थान बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.असे डीन प्रा.डॉ. सुजाता कदम यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात विविध शैली आणि तंत्रे एकत्रित करण्राया डायनॅमिक योगा फ्यूजन सत्रे आयोजित करण्यात आली होती. डॉ. योगेश शिंदे यांनी योग जागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी  संपूर्ण महिन्यात आयोजित केलेल्या सात उपक्रमांचा आढावा दिला.कार्यक्रमाची सांगता डॉ. सरिता कापगते यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. या कार्यक्रमात योगद्वारे पुरस्कृत सुसंवाद, आरोग्य आणि आंतरिक शांती या कालातीत मूल्यांना बळकटी देण्यात आली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article