ग्रीन पार्क स्टेडियमवर सरावाला प्रारंभ
भारत-बांगलादेशच्या खेळाडूंचा कसून सराव : दुसरी कसोटी उद्यापासून
वृत्तसंस्था/ कानपूर
भारत आणि बांगलादेश यांच्यात 27 सप्टेंबरपासून ऐतिहासिक ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. चेन्नईतील पहिली कसोटी जिंकून टीम इंडिया 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळविली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने आता दुसरी कसोटी जिंकून बांगलादेशचा व्हाईटवाश करण्यावर अधिक भर दिला आहे. यासाठी भारतीय संघाटने बुधवारी कसून सरावही सुरू केला आहे. शहरात बुधवारी सकाळच्या सत्रात बांगलादेशच्या खेळाडूंनी नेट सराव करून घाम गाळला होता. तर दुपारी दीड वाजता भारतीय संघ स्टेडियमवर पोहोचला. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दुपारी दीड वाजल्यापासून सुमारे एक तास नेट सराव केला.
यादरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह, फिरकीपटू आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि इतरांनी गोलंदाजी केली. विराट कोहलीने दुपारी अडीच नंतर काही काळ विश्र्रांती घेतली. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास तो पुन्हा एकदा नेटवर पोहोचून सरावाला सुऊवात केली. प्रशिक्षणार्थी गोलंदाज जमशेदने जेव्हा विराट कोहलीला चेंडू टाकला तेव्हा विराटनेही त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले, अशी चर्चा ग्रीन पार्क स्टेडियमवर होती.
बुधवारी, जेव्हा भारतीय खेळाडूंनी ग्रीन पार्क स्टेडियमवर नेट सराव सुरू केला तेव्हा ते सर्व कमालीच्या आर्द्रतेमुळे त्रस्त असल्याचे दिसून आले. नेटवर सराव करण्याव्यतिरिक्त खेळाडूंनी कॅच पडण्याचा सरावही केला. दरम्यान, शुभमन गिलने सर्वाधिक हवेत शॉर्ट्स मारले. खेळाडूंची वाहने ग्रीन पार्क स्टेडियमवर येताच त्यांची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमभोवती प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. यामध्ये तऊणांची संख्या मोठी होती.
हसन आणि तस्किनची गोलंदाजी
चेन्नई येथे झालेल्या भारत-बांगलादेश कसोटीतील पहिल्या सामन्यात पाच बळी घेणारे वेगवान गोलंदाज हसन आणि तस्किन यांनी नेटसेशनमध्ये जोरदार शानदार गोलंदाजी करत सराव केला. शाकिब अल हसन, शांतो, लिटन दास आणि रहीम या प्रमुख गोलंदाजांनी खेळपट्टीचे वर्तन आणि त्यातून मिळणारा पाठिंबा तपासण्यासाठी पुढाकार घेतला.