For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राजा साब’मध्ये प्रभास

06:37 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘राजा साब’मध्ये प्रभास
Advertisement

मालविका, निधीसोबत करणार रोमान्स

Advertisement

दक्षिणेचा सुपरस्टार प्रभासला तुम्ही प्रामुख्याने अॅक्शन अवतारातच पाहिले असेल, परंतु आता त्याची लुंगी परिधान करून स्टाइल झाडणारी भूमिका स्क्रीनवर पहायला मिळणार आहे. प्रभासचा नवा चित्रपट ‘राजा साब’चे पहिले पोस्टर सादर  करण्यात आले आहे.

मारुती यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या या चित्रपटात प्रभास हा मालविका मोहनन आणि निधी अग्रवाल यांच्यासोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. पोस्टरवर प्रभास शर्टसोबत लुंगी परिधान करून आणि पायांमध्ये चप्पल घातलेल्या स्थितीत दिसून येतो. या चित्रपटात रिद्धि कुमार देखील मुख्य भूमिकेत आहे. एस. थम्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तेलगू, तमिळ, मल्याळ, कन्नड आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभास यापूर्वी प्रशांत नील यांचा चित्रपट ‘सलार : पार्ट 1- सीझफायर’ चित्रपटात दिसून आला होता. सध्या तो नाग अश्विन सोबत ‘कल्कि 2898 एडी’चे चित्रिकरण करत आहे. बिगबजेट असलेल्या सायन्स फिक्शन चित्रपटात दीपिका पदूकोन, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच संदीप रे•ाr वांगा यांच्या ‘स्पीरिट’ या चित्रपटात तो दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.