महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वृक्षांच्या फांद्या कोसळल्याने क्लब रोड परिसरात 10 तास वीजपुरवठा ठप्प

11:35 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हेस्कॉमकडून तातडीने दुरुस्ती, पर्यायी मार्गाने पुरवठा

Advertisement

बेळगाव : जोरदार वाऱ्यासह गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे क्लब रोड परिसरात वृक्षांच्या फांद्या कोसळून विद्युतवाहिन्यांचे नुकसान झाले. 33 केव्ही मुख्य वाहिनी तुटल्याने परिसरात तब्बल दहा तास वीजपुरवठा ठप्प होता. शुक्रवारी दिवसभरात दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहराच्या उत्तर व दक्षिण भागात काहीकाळ वीजपुरवठा खंडित होता. ज्या ठिकाणी लहान-मोठी झाडे विद्युतवाहिन्यांवर कोसळली, त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

Advertisement

ज्या ठिकाणी पर्यायी मार्गे वीजपुरवठा करणे अशक्य होते, अशा ठिकाणी दुरुस्ती करून मध्यरात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. क्लब रोड येथील भाऊराव काकतकर कॉलेज प्रवेशद्वारानजीक 33 केव्ही विद्युतवाहिनीवर झाडाचा बुंधा कोसळला होता. मुख्य वाहिनीच तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा बराच वेळ बंद होता. सिव्हिल हॉस्पिटल व परिसराला पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्यात आला. परंतु, उर्वरित भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात होता. शुक्रवारी सकाळपासून हेस्कॉम व केपीटीसीएलचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामामध्ये व्यस्त होते. दहा तासांनंतर या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article