विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात शनिवार दि. 22 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, रेड्डी भवन, जैन मंदिर, पाणीपुरवठा केंद्र, शंकरानंद हाऊस, वॉटर सप्लाय बोर्ड, डीसी हाऊस, आदर्श कॉलनी, पीडब्ल्यूडी घरे, क्लास 12 व 3 पाटबंधारे खात्याची घरे, बीईओ कार्यालय, एनसीसी कार्यालय, जाधवनगर, सेठ हाऊस, उमेश कत्ती अपार्टमेंट, हुगार हाऊस, पोतदार हाऊस, संपिगे रोड, बुडा कॉम्प्लेक्स, हनुमाननगर रोड क्र. 2, स्केटिंग मैदान, प्राप्तिकर कार्यालय, श्रीनगर, चन्नम्मा सोसायटी, अंजनेयनगर, अशोकनगर, आसदखान सोसायटी, बुडा स्मार्ट सिटी कार्यालय, क्लब रोड, सीपीएड् मैदान, वनिता विद्यालय, सरदार्स मैदान, सरदार्स स्कूल, गणाचारी गल्ली, चांदू गल्ली, काकतीवेस, डीसी कार्यालय, न्यायालय, कन्नड साहित्य भवन, जिल्हा पंचायत कार्यालय, कॉलेज रोड, सन्मान हॉटेल, सिटी पोलीस लाईन, आयुक्तांची नूतन इमारत, काळी आमराई आदी भागाचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.