कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात वीज व्यवस्थेचे तीनतेरा

11:33 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना फटका : दुरुस्तीच्या नावावर दिवसभर वीजपुरवठा ठप्प

Advertisement

बेळगाव : शहरात दुरुस्तीच्या नावाखाली हेस्कॉमकडून सलग तिसऱ्या मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मागील दोनवेळा कोणतीही पूर्वसूचना न देता तर यावेळी सूचना देऊन वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी वीज बंद असल्याने व्यापाऱ्यांसह ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना फटका बसला. त्यामुळे हेस्कॉमने दुरुस्ती करताना नागरिकांचा विचार करूनच वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

हेस्कॉमकडून सध्या मान्सूनपूर्व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात वीजपुरवठा बंद करून दुरुस्ती करण्यात येत आहे. वर्षभर दुरुस्तीचे काम सुरू असताना पुन्हा दुरुस्तीसाठी वीजपुरवठा दिवसभर खंडित करण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील 15 दिवसांपासून टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. त्यातच पावसामुळेही झाडे कोसळून व फांद्या पडून विजेचा लपंडाव सुरू आहे.

भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, या परिसरात सलग तिसऱ्या मंगळवारी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कोरोनानंतर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना दिवसभर वीजपुरवठा असणे आवश्यक असते. मंगळवारी रविवार पेठ तसेच इतर बाजारपेठ बंद असल्याने दुरुस्तीचे काम करण्यात येते. परंतु याचा परिणाम ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना बसत आहे. या ऐवजी रविवारी दुरुस्तीचे काम करण्याची मागणी केली जात आहे.

सर्वत्र जनरेटरची घरघर

मंगळवारी शहरासह उपनगरांमध्ये दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर जनरेटरची घरघर ऐकायला येत होती. वीजपुरवठा नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर, इन्व्हर्टर यांचा वापर वाढला होता. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत बऱ्याचशा भागात वीजपुरवठा बंद असल्याने काही दुकाने बंद करून घरी जाणे पसंत केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article