विविध भागात रविवारी वीजपुरवठा खंडित
बेळगाव : दुरुस्तीच्या कारणास्तव विविध भागात रविवार दि. 24 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे. मुचंडी, अष्टे, कॅम्बेल, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्निहाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदन होसूर, एमईएस सांबरा, मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खणगाव, चंदूर, चंदगड, गणिकोप्प, गुंजेनट्टी, केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनहट्टी, अतिवाड, बोडक्यानट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी, निंग्यानट्टी, गुरामट्टी, हळेइद्दलहोंड, शिवापूर, परशानट्टी, दासरवाडी, केंचानट्टी, सोनट्टी, काकती, कंग्राळी बुद्रुक, बैलूर, हेग्गेरी, हुल्यानूर, बुड्य्रानूर, धरनट्टी, भरनट्टी, गैंडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी ही गावे व गावांतील कृषीपंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
110 केव्ही सुवर्णसैध उपकेंद्र
कोंडसकोप, हालगा, बस्तवाड, शगनमट्टी, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपूरम, साईनगर, भरतेश कॉलनी, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस, कमकारहट्टी, बडेकोळ्ळमठ, कोळीकोप्प ही गावे व या गावांतील कृषीपंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.
110 केव्ही वडगाव उपकेंद्र
धामणे, कुरुबरहट्टी, माश्यानट्टी, देवगनहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी ही गावे व या गावांतील कृषीपंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.