रविवारी तालुक्यातील काही गावांत वीजपुरवठा ठप्प
बेळगाव : वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याने बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये रविवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. वडगाव उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, अवचारहट्टी, यरमाळ, येळ्ळूर, सुळगा, राजहंसगड, देसूर, नंदिहळ्ळी, कोंडसकोप, हलगा, बस्तवाड या गावांमध्ये वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. कणबर्गी उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या मुचंडी, अष्टे, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ, मावीनकट्टी, तारिहाळ, चंदनहोसूर, सांबरा, मुतगा, सुळेभावी, मोदगा, खनगाव, चंदगड, गुंजेनहट्टी, केदनूर, मण्णिकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, अतिवाड, बोडक्यानहट्टी, कुरिहाळ, कट्टणभावी, सोनट्टी, काकती, कंग्राळी, बैलूर, हेग्गेरी, हुल्यानूर, गौंडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी तसेच सुवर्णसौध उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, कोळीकोप, बडेकोळमठ, मुत्नाळ, नंदिहळ्ळी, कुकडोळी यासह इतर गावांमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.
विविध भागात उद्या वीजपुरवठा खंडित
वीजवाहिन्यांची तपासणी व दुऊस्तीच्या कारणास्तव विविध भागात रविवार दि. 9 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. केएचबी कॉलनी, वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध 1 व 2, बसवेश्वर सर्कल, शहापूर नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवाण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, माऊतीनगर, हरिकाका कंपाऊंड, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, जुने बेळगाव, खासबाग, बसवाण गल्ली, बाजार गल्ली, माऊती गल्ली, केआयएडीबी ऑटोनगर औद्योगिक वसाहत, केएसआयडीबी औद्योगिक वसाहत, सिद्धेश्वर फौंड्रीज, टाटा पॉवर, बरस्वाल, एशियन इंडस्ट्रियल, केआयएडीबी एक्झिबीशन सेंटर, केएसआरटीसी डेपो, पोल्युशन सेंटर बोर्ड, यादव इंडस्ट्रीज, कणबर्गी, केएचबी कॉलनी, आंबेडकर कॉलनी, रामतीर्थनगर, स्कीम नं. 35, 43, 43 ए, गणेशपूर सर्कल ते प्रतीक्षा हॉटेलपर्यंत, तसेच स्टेट बँक म्हैसूर परिसर, पीएल नं. 1 ते पीएल नं. 1124, रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती औद्योगिक वसाहत, मुत्यानट्टी, बसवणकोळ, काकती सिद्धेश्वरनगर, केआयएडीबी ऑटोनगर औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.