कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मडगाव परिसरात आजपासून चार दिवस खंडित वीजपुरवठा

12:56 PM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : वीज खात्यातर्फे मडगावातील ट्रान्स्फॉर्मर बॉक्समधील एलव्ही बोर्ड, फिडर पिलर्स व सर्व्हिस  पिलर्स बदलायचे काम आज सोमवार दि. 21 ते शुक्रवार दि. 25 एप्रिल पर्यंत हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे मडगाव परिसरातील काही भागात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. आज सोमवार दि. 21 रोजी कामत मिलन ट्रार्न्स्फार्मरवरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे स्टार सिटी हॉटेल, जनता फॅमिली रेस्टॉरंट, दिलखुष उडपी हॉटेल, आनंद तिंबलोजवळील व्ही. बी. साखरे शॉप आणि परिसरात वीज पुरवठा होणार नाही. मंगळवार दि. 22 रोजी कामत मिलन, पंचशील हॉटेलजवळील ट्रान्स्फॉर्मरवरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे कामत बिल्डिंग, हॉटेल मोहिनी गोवा समोरील प्लायवुडस हॉटेल, सिटी गार्डन, कुडतरकर शॉपिंग सेंटर आणि परिसरात वीज पुरवठा होणार नाही.

Advertisement

बुधवार दि. 23 रोजी बाबय कॉमर्स ट्रान्स्फॉर्मरवर काम हाती घेतले जाणार असून या दिवशी फिटवेडस् क्लॉथस्, बाबय कॉमर्स सेंटरचा आतील भाग व परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. गुरूवार दि. 24 रोजी जुने हरि मंदिर ट्रान्स्फॉर्मरवर काम हाती घेतले जाणार आहे. या दिवशी मुश्ताफा बुटीक, अपोलो फार्मासी, व्हिसा प्लाझा, हरिमंदिर जवळ, डिवाईन मेडिकल सेंटर कामत कमर्शिअलजवळ, कुरतरकर शॉपिंग सेंटरजवळ, प्रेस्टीज शॉप आणि परिसरात वीज पुरवठा खंडित होणार आहे. शुक्रवार दि. 25 रोजी कुरतरकर प्लाझा ट्रान्स्फॉर्मरवर काम हाती घेतले जाणार आहे. या दिवशी सिल्वर टॉवर, घुमटी मंदिरजवळ, डायकिन एसी, शांतादुर्गा जनरल स्टॉअर्स, विशांत थिएटरजवळ आणि परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article