For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रविवारी शहराच्या बहुतेक भागात वीजपुरवठा खंडित

10:47 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
रविवारी शहराच्या बहुतेक भागात वीजपुरवठा खंडित
Advertisement

बेळगाव : दुरुस्तीच्या कामानिमित्त रविवार दि. 9 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत टिळकवाडी, कॅम्प, शहापूरसह शहरातील मध्यवर्ती भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. रविवारी सकाळी नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, रॉय रोड, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, पॉवर हाऊस, राणाप्रताप रोड, खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी क्रॉस, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीर भवन, वड्डर गल्ली, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हॉस्पिटल, गुड्सशेड रोड, खानापूर रोडवर वीजपुरवठा खंडित असणार आहे.

Advertisement

मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, स्वामी विवेकानंद कॉलनी, एम. जी. रोड, टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी रोड, खानापूर रोड, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस थिएटर रोड, मिलिटरी परिसर, जे. एल. विंग एक्स्प्रेस फिडर, हायस्ट्रीट, कोंडाप्पा स्ट्रीट, विजयनगर, ओंकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, करियप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार लेआऊट, द्वारकानगर, अयोध्यानगर, गुड्सशेड रोड, महात्मा फुले रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्स्पोर्ट, कोरे गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्राrनगर पहिला क्रॉस, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी रोड, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्राr अड्डा, महात्मा फुले रोड, भोज गल्ली परिसरात वीजपुरवठा खंडित होणार आहे.

वडगाव-अनगोळ परिसर

Advertisement

रविवार दि. 9 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 यावेळेत दुरुस्तीच्या कामानिमित्त उपनगरातील बहुतेक भागात वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. राणी चन्नम्मानगर फर्स्ट स्टेज, दुसरे स्टेज, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर फर्स्ट क्रॉस, दुसरा क्रॉस, विजय गल्ली, रयत गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, वड्डर छावणी, ढोर गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बस्ती गल्ली, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, पाटील गल्ली परिसरात वीजपुरवठा बंद असणार आहे.

सुभाष मार्केट हिंदवाडी, आर. के. मार्ग हिंदवाडी, कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड, भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी, पहिला व दुसरा क्रॉस, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन परिसर, आनंदवाडी, अनगोळ, वडगाव, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साईश्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, अनगोळ, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर केएलई, अन्नपूर्णेश्वरीनगर, आनंदनगर, आदर्शनगर पहिला ते पाचवा क्रॉस, पटवर्धन लेआऊट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, नाथ पै सर्कल, जेल शाळा, गोमटेश विद्यापीठ परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.