For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराच्या बहुतांश भागात उद्या काही काळ खंडित वीज

07:46 PM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहराच्या बहुतांश भागात उद्या  काही काळ खंडित वीज
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

वडगाव येथील 110 केव्ही विद्युतवाहिनीत बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा गुरुवार दि. 22 रोजी काही तासांसाठी खंडित केला जाणार आहे. पहाटे 6 ते सकाळी 9 या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तुटलेली विद्युतवाहिनी जोडण्याचे काम केले जाणार असल्याने नेहरूनगर, रेल्वेस्टेशन, श्रीनगर, सदाशिवनगर, कणबर्गी, काकती व बाळेकुंद्री या उपकेंद्रातून वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

शहराच्या उत्तर भागातील वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णावाडी, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, केएलई परिसर, विनायकनगर, ज्योतीनगर, संगमेश्वरनगर, उषा कॉलनी, सिद्धेश्वरनगर, एपीएमसी रोड, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कंपाऊंड, पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, शिवबसवनगर, रामनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केईबी क्वॉटर्स, सुभाषनगर, महानगरपालिका, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, रेलनगर, संपिगे रोड, आंबेडकरनगर, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, क्लब रोड, टी. व्ही. सेंटर, पी अँड टी कॉलनी, हनुमाननगर, मुरलीधर कॉलनी, जिना बकुळ परिसर, कोल्हापूर सर्कल, नेहरूनगर, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, आश्रय कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, वृंदावन कॉलनी, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड, शिवबसवनगर, अशोकनगर, कुमारस्वामी ले-आऊट, सारथीनगर, सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, बुडा ले-आऊट, जयनगर, विजयनगर, पाईपलाईन रोड, सैनिकनगर, लक्ष्मी टेकडी पाणीपुरवठा, विनायकनगर, हिंडलगा गणपती परिसर, महाबळेश्वरनगर, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, केएचबी कॉलनी, ऑटोनगर, कणबर्गी औद्योगिक वसाहत, रामतीर्थनगर, अलारवाड, सुवर्णसौध परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Advertisement

त्याचबरोबर शहराच्या दक्षिण भागातील मारुती कॉलनी, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड, रानडे रोड, आगरकर रोड, हिंदूनगर, राणा प्रताप रोड, गोवावेस, गुड्सशेड रोड, सोमवारपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ, हिंदवाडी, खानापूर रोड, इंद्रप्रस्थनगर, बसवेश्वर सर्कल, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवण गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, स्वामी कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हलगा रोड, जुने बेळगाव, खासबाग, बाजार गल्ली, मारुती गल्ली या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisement
Tags :

.