शहराच्या दक्षिण भागात उद्या वीजपुरवठा खंडित
बेळगाव : हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने रविवार दि. 23 रोजी शहराच्या दक्षिण विभागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे. राणी चन्नम्मानगर, बुडा लेआऊट, सुभाषचंद्रनगर, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांगनगर, रथ गल्ली, मलप्रभानगर, कल्याणनगर, तेग्गीन गल्ली, गणेशपेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, बसती गल्ली, माधवपूर, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ-वडगाव रोड, संत मीरा रोड, पारिजात कॉलनी, सुभाष गल्ली, रघुनाथ पेठ, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीरनगर, आंबेडकरनगर, संभाजीनगर, केशवनगर, अन्नपुर्णेश्वरीनगर, आनंदनगर, पटवर्धन लेआऊट या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.