For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर-पारिश्वाड क्रॉसजवळील नाल्यावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे

10:46 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर पारिश्वाड क्रॉसजवळील नाल्यावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

जत्त-जांबोटी रस्त्यादरम्यान खानापूर शहराजवळील पारिश्वाड क्रॉस लगतच्या नाल्यावरील पुलाजवळच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात अनेक  वाहनधारक पडल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेले खड्डे मोठमोठे आहेत. पावसामुळे या खड्ड्यांतून पाणी भरले आहे. पारिश्वाड, गर्लगुंजी भागातून खानापूरला भरधाव येणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहनधारक खड्ड्यांत पडून अपघात होत होत आहेत. वाहनांची मोडतोड होत आहे. यामुळे आर्थिक संकट पुढे राहत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या लगत पूल आहे. पुलाचे कठडे उंच आहेत. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनधारक पुलाच्या कठड्याला धडक मारीत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. सकाळ व सायंकाळच्या वेळेत या रस्त्यावर वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे लागलीच येथील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी वाहनधारक व जनतेतून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.