कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करडीगुद्दीच्या घाटातील रस्त्यावर जीवघेणे खड्डे : वाहनधारकांना धोका

12:07 PM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाळेकुंद्री : बेळगाव-बागलकोट रस्त्यादरम्यान करडीगुद्दी गावच्या घाटाच्या रस्त्यावर पावसामुळे अनेक दिवसांपासून रस्त्यावर धोकादायक खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून परतीचा पाऊस तसेच अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तसेच घाटाजवळच्या वळणावर पडलेला मोठा खड्डा रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना दिसत नाही. सदर अपघात रात्रीच्या वेळी होण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी हे खचलेल्या रस्त्यावरील खड्डे निदर्शनास येत नाहीत. यामुळे अपघात घडू शकतो. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी करडीगुद्दी गावच्या ग्रामस्थांतून व प्रवासीवर्गातून होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article