देवीच्या पालखी मार्गात खड्डे अन् धुळीचे साम्राज्य
कोल्हापूर / संग्राम काटकर :
केल्हापुरातील विविध रस्त्यांसारखीच वाईट अवस्था करवीर निवासिनी अंबाबाई व तुळजाभवानी मातेच्या पालखी मार्गाची झालेली आहे. हे सर्व पालखी मार्ग अंबाबाई व तुळजा भवानी मंदिराच्या चारी बाजूला 200 मीटर अंतरावर आहेत. या मार्गातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. अनेक खड्डयांमध्ये टाकलेली बारीक व मोठी खडी निसटून ती रस्त्यावरच अस्थाव्यस्थ पसरलेली आहे. वेळीच खडी गोळा करण्याबरोबरच रस्त्यांवर भक्कम असे डांबरीकरणच करणे आवश्यक आहे.
पालखीसोबत अनवाणी चालणाऱ्या हजारो भाविकांनाचीही खडी बोचण्यातून होणाऱ्या वेदनांपासून सुटका होणार नाही. सर्वात वाईट म्हणजे अंबाबाई मंदिराभोवतालच्या पालखी मार्गातील रस्त्यावर अस्थाव्यस्थ पसललेल्या बारीक व मोठ्या खडीची वाहने जाऊन जाऊन पडू झाली आहे. वाहनांच्या वर्दळीने हे पुड रोज हवेत उडत आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून व तुळजाभवानी मंदिरात कोल्हापूरचे राजघराणे आणि छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टकडून नवरात्रोत्सवाची तयारी सुऊ आहे.
लवकरच तयारी पूर्ण करून 22 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष नवरात्रोउत्सवाला सुरुवात केली जाईल. परंपरेनुसार पहिल्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत देवस्थान समिती व छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टकडून पालखी सोहळाही सुरु करण्यात येईल. या सोहळ्याअंतर्गत विविध दिवसांना अंबाबाई, तुळजा भवानी आणि गुरु महाराजांची पालखी अंबाबाई मंदिर व तुळजा भवानी मंदिराभोवतालच्या रस्त्यांवर येत राहणार आहे.
यापैकी बिनखांबी गणेश मंदिर ते मिरजकर तिकटी, करवीरनगर वाचन मंदीर ते बिंदू चौक, तुळजाभवानी मंदिर ते बालगोपाल तालीम ते मिरजकर तिकटी या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने बारीक व मोठ्या खडींचा वापर केला होता. परंतू खडींच्या खाली व वर पुरेसे डांबर टाकलेले नाही. शिवाय वाहने जाऊन जाऊन व पावसामुळे खड्डयांवरील खडीही निसटली आहे. निसटलेली खडी अस्थाव्यस्थ पसरली असून त्यावऊन अंबाबाई व तुळजा भवानीमातेची पालखी अनवाणी वाहून नेणे कठीण जाणार आहे.
नवरात्रौत्सवातील ललिता पंचमीदिनी अंबाबाई, तुळजा भवानी आणि गुरु महाराजांची पालखी व लवाजमा हा कोहळा पुजन व टेंबलाईच्या भेटीसाठी जुना राजवाड्याचा नगारखाना ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावऊनच जातो. शिवाय याच मार्गावऊनच शाही दसरा सोहळ्यासाठी दसरा चौकाकडे पालख्या जात असतात. या मार्गांवर पालखींचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक उभे असतात.
आज या मार्गाची अवस्था बघवणार नाही, अशी आहे. जुना राजवाड्याचा नगारखाना ते शिवाजी चौक या मोठ्या अंतराच्या रस्त्यावर 6 महिन्यापूर्वी खोदकाम कऊन ड्रेनेज लाईन टाकली. या ड्रेनेज लाईनशेजारच्या भागात उभारलेल्या लाईट अॅण्ड साऊंड लॅम्प पोलला विद्यूत पुरवठा करण्यासाठी भूमिगत वायर टाकलेली आहे. ही वायर टाकण्यासाठीही एक फुटांची चर काढली आहे. ही चर बुजलेली असली तरी त्यावरील खडी व माती पावसाच्या माऱ्याने निघालेली आहेत. ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम केलेल्या जागेवर तर अद्यापही महापालिकेने डांबरीकरण केलेले नाही. वेळ काढूपणा करण्यासाठी खोदकाम काम केलेल्या जागेवर मुऊम टाकला आहे. एकंदरीत महापालिकेला विचारणा करण्यासाठी समाजातील कोणीच पुढे येत नसल्यानेच अंबाबाई व तुळजा भवानीमातेच्या पालखी मार्गाची विचित्र अवस्था झाली आहे.
- रस्त्यावरील दुकानदारांना श्वास घेणे झाले अवघड...
अंबाबाई मंदिराभोवतालच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली बारीक व मोठी खडी वाहनांच्या वर्दळीने निघालेली आहे. मोठे वाहन रस्त्यावऊन गेल्यानंतर उडणारी धुळ दुतर्फा असलेल्या दुकानात जात आहे. दुकानांमधील कपडे, भांडी, हॉटेल्स, चप्पल, काऊंटरसह जीवनावश्यक वस्तू मळकट होताहेत. मळलेल्या वस्तू ग्राहक घेत नाहीत. त्यामुळे दुकानदारांना वस्तू सतत स्वच्छ कराव्या लागतात. धुळीमुळे दुकानदार व कामगारांनाही श्वास घेणे मुश्कील झाले आहे.
-संतोष तावडे (हॉटेल व्यावसायिक)
- दहा वर्षांपासून रस्त्यावर डांबर नाही
जुना राजवाड्याचा नगारखाना ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर 10 वर्षांपासून डांबर पडलेले नाही. या रस्त्यावर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदकामावरही डांबर टाकलेली नाही. याही रस्त्यावरील धुळ दुकानांमध्ये जात आहे. ड्रेनेज लाईनसाठी केलेल्या खोदकामच्या ठिकाणी शिवप्रेमी आझाद मंडळ नवरात्रोत्सव साजरा करणार आहे. रस्त्यावर डांबरीकरण केले नाही तर मात्र भाविकांना खोदकामावर उभे राहून मंडळाच्या दुर्गामूर्तीचे दर्शन घ्यावे लागेल.
-तानाजी पाटील (अध्यक्ष : शिवप्रेमी आझाद मंडळ)