For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लिंबखिड ते आनेवाडी सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे

01:57 PM Aug 25, 2025 IST | Radhika Patil
लिंबखिड ते आनेवाडी सेवा रस्त्यावर खड्डेच खड्डे
Advertisement

गोडोली :

Advertisement

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका पर्यंतच्या सेवा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू पाहणारा या मार्गावरील हा सेवा रस्ता खूपच खराब झाला आहे या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने हा रस्ता दरवर्षी खराब होत आहे निकृष्ट दर्जाचे होत असलेले येथील डांबरीकरण त्याचा नाहक त्रास वाहन चालकांना सोसावा लागत आहे.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने, डंपर, टक यांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात असते. सध्या या सेवा रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. बऱ्याचदा वाहन चालकांना विशेषतः दू व्हीलर वाहने खड्ड्यात साठलेल्या पाण्यात आदळतात त्यामुळे वाहन चालकांना शारीरिक इजा होत आहे

Advertisement

लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका येथील सेवा रस्ता नेहमीच खराब झाल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची ही संख्या मोठी आहे. विशेषतः मर्दे, कुशी, नागेवाडी, लिंब, रायगाव, सायगाव येथील नागरिक या सेवा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. सध्या या सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.

  • कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी

लिंबखिंड ते आनेवाडी टोल नाका रस्ता खराब होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे काढणे आवश्यक आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता खराब होत आहे.

                                                                                                                             - श्रीरंग काटेकर सातारा.

Advertisement
Tags :

.