कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Tarun Bharat Effect : कुडाळ-पाचगणी मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू

04:39 PM Nov 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                      तरुण भारत'च्या बातमीनंतर प्रशासनाकडे तत्काळ प्रतिसाद

Advertisement

कुडाळ : 'तरुण भारत संवाद मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था' या परखड बातमीचा प्रशासनावर तत्काळ परिणाम झाला आहे. या वृत्तानंतर जावळी तालुका बांधकाम विभागाने कुडाळ-पाचगणी शनिवारपासूनच मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनी 'तरुण भारत' चे आभार व्यक्त केले.

Advertisement

कुडाळ ते हुमगाव ते पाचगणी या प्रमुख मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड खडे निर्माण झाले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. 'विकास नको, पण रस्ते खड्डेमुक्त करा, असा संतपरा नारा देत स्थानिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अनेकदा तक्रारी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर 'तरुण भारत'ने या विषयावर परखड बातमी प्रसिद्ध करत प्रश्नाला वाचा फोडली होती.

या बातमीची दखल घेत जावळी तालुका बांधकाम विभागाने तातडीने पथक रवाना केले. शनिवारी पहाटेपासूनच काम सुरू झाले असून, कुडाळ, या मार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे स्थानिक वाहनचालक, प्रवासी आणि पर्यटकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

यासंदर्भात मनसेचे जावली तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे यांनी तत्काळ रस्त्यावरील खड्डे मूजवा अन्यथा रस्त्यांच्या खड्ड्यांना कलर मारून प्रशासनाचा आणि बांधकाम विभागाचा निषेध नोंदवणार असल्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन व बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. मनसेच्या इशाऱ्याची आणि 'तरुण भारत संवादच्या बातमीची दखल घेत तत्काळ रस्ता खड्डे मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली.

सुस्त असलेल्या बांधकाम विभागाला जाग आणण्याचे काम है मनसेने करून दाखवलेल आहे. पुन्हा जर यांना झोप लागली तर झोपेतून जागे मनसे स्टाईलने करणार आधीच संपूर्ण तालुक्यात रस्त्याची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कामांमुळे आहे ते रस्ते उध्वस्त करून नवीन रस्त्याची कामे सुरू आहेत. जिथे कामे सुरू नाहीत तिथे देखील खड्डे आहेत. त्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात ज्या रस्त्यांची कामे सुरू नाहीत, ते तरी रस्ते नीट ठेवा अन्यथा मनसे स्टाईलने अधिकाऱ्यांना झोपेतून जागे करणार असा इशाराही मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश दुर्गावळे यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#ManseAlert#tarunbharatimpactInfrastructureUpdateLocalGovernancemaharashtranews
Next Article