महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा राज्यात स्टार्टअप हब बनविण्याची क्षमता : मुख्यमंत्री

06:24 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिट्स पिलानी येथे इनोव्हेशन अँड स्टार्टअप्सचे उद्घाटन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी / वास्को

Advertisement

 

राज्यातील उद्योग, पर्यटन व्यवसाय टिकवून ठेवण्याबरोबरच स्टार्टअपला चालना देणाऱ्या विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या ताकदीवर लक्ष केंद्रित करून युवक कौशल्यप्राप्त शिक्षण घेण्यास सरसावत आहेत. त्यामुळे गोवा राज्यामध्ये स्टार्टअप हब बनण्याची क्षमता आहे आणि तसा मला विश्वास आहे, असे प्रेरणादायी उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

गोवा कॅम्पस बिट्स पिलानी येथील गोवा इनोव्हेशन अँड स्टार्टअप टाइम्स (जीआयएसटी-23)च्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी यावेळी बिट्स पिलानी गोवा कॅम्पसचे संचालक प्रा. सुमन कुंडू, उद्योजक नितीन कुंकळ्ळेकर, बिट्स पिलानीचे प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा राज्यात अनेक अभिनव अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळे राज्याचा विकास हा जोमाने सुरू आहे. नोकऱ्यांच्या बाबतीत एकट्या सरकारवर अवलंबून न राहता रोजगार निर्माण करणाऱ्या युवकांची राज्याला गरज आहे. ही गरज कौशल्यप्राप्त शिक्षण घेतल्यानंतरच पूर्ण होणार आहे. त्यादृष्टीने आजच्या युवकांनी आपले लक्ष्य केंद्रीत करावे आणि रोजगार देणारे, निर्माण करणारे भावी उद्योजक म्हणून पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

उच्च वाढीच्या स्टार्टअप्समध्ये कल्पनांना सक्षम करणे आणि त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून त्यांना आकर्षित करणे यासाठी सरकार आग्रही आहे. युवकांच्या  यशोगाथा अधोरेखित करून गोव्यातील तऊणांसाठी उद्योजकता अधिक महत्त्वाकांक्षी बनविण्याबाबतही आपण आग्रही असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article