महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बटाटा-कांद्याचा भाव स्थिर, भाजीपाला दरात किंचित वाढ

06:08 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्यामुळे भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचा तुटवडा

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

Advertisement

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, बेळगाव जवारी बटाट्याचा भाव स्थिर झाला. तसेच महाराष्ट्र कांद्याचा भाव देखील प्रति क्विंटल स्थिर झाला. सध्या कडक उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असल्यामुळे भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच उष्णतेमुळे नागरिकांतून हिरव्या भाजीपाल्यांना अधिक मागणी दिसून येत आहे. त्यामुळे काही भाजीपाल्यांचे भाव किंचित वाढले आहेत. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र कांद्याचा भाव स्थिर आहे. तसेच बेळगाव जवारी बटाटा आणि रताळी दर देखील स्थिर आहेत. मात्र परराज्यातून येणारा आग्रा बटाटा आणि इंदोर बटाटा भाव मात्र गेल्या एक महिन्यापासून हळुहळु वाढू लागले आहेत. कारण या बटाट्याला स्थानिक बाजारात उत्तम भाव मिळत आहे. आणि इंदोर बटाट्याची कमतरता भासू लागली आहे. यामुळे बटाटा दरात वाढ होत असल्याची माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

मागच्या आठवड्यातील शनिवार दि. 6 रोजी झालेल्या मार्केट यार्डच्या बाजारात इंदोर बटाटा भाव 2000 पासून 2800 रुपये, आग्रा बटाटा 2000 ते 2500 रुपये, बेळगाव बटाटा 500 ते 2700 रुपये झाला होता. रताळी भाव 1400 ते 1600 रुपये, गुळाचा भाव 4500 ते 5000 रुपये झाला होता. कांद्याचा भाव क्विंटलला गोळी 500 ते 800, मीडियम 1500 ते 1600, मोठवड 1500 ते 1600, गोळा 1700 ते 1800 रुपये झाला होता.

तर बुधवार दि. 10 रोजी झालेल्या बाजारात इंदोर मोहन जातीचा बटाटा भाव 2100 ते 2200 रुपये झाला. इंदोर ज्योती जातीचा बटाटा भाव 2500 ते 2700 रुपये झाला होता. महाराष्ट्र कांदा-गोळी 500 ते 800, मीडियम 1500 ते 1600, मोठवड 1700 ते 1800, गोळा 1800 ते 1900 रुपये झाला होता. आग्रा बटाटा भाव 2400 ते 2500 रुपये झाला होता. तर रताळी 1500 ते 1600 रुपये, गुळ भाव 4500 ते 5000 रुपये क्विंटल, बेळगाव जवारी बटाटा गोळी 500 ते 700, मीडियम 1000 ते 1400, मोठवड 2200 ते 2300 व गोळा 2400 ते 2600 रुपये झाला होता.

त्याचप्रमाणे शनिवार दि. 13 रोजी झालेल्या मार्केटयार्डमधील सवालामध्ये वरील भाव झाले. यामुळे शनिवारच्या बाजारभावामध्ये सर्व भाव स्थिर झाले आहेत.

 

कांदा भाव स्थिर

सध्या महाराष्ट्रातून देशभरातील विविध बाजारात कांदा विक्रीसाठी जात आहे. त्याचप्रमाणे बेळगाव मार्केट यार्डला देखील येत आहे. सध्या कांदा पाकड व उत्तम दर्जाचा बाजारात येत आहे. खाण्यासाठी एकदम चवदार असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक वर्षभर खाण्यासाठी 2 ते 5 पोती खरेदी करून घरामध्ये साठवून ठेवतात. हा कांदा वर्षभर टिकतो. मीडियम आकाराचा गरण्या रंगाचा कांदा अधिक काळ टिकतो. व खाण्यासाठी देखील चवदार असतो. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अशा या कांद्याला शेतकऱ्यांना परवडण्यासारखा भावच या हंगामात मिळत नाही. यामुळे महाराष्ट्र शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपये कर्ज काढून पीक घेतलेले असते.

इंदोर बटाट्याचा तुटवड

इंदोरमध्ये बटाटा काढणीला डिसेंबर 2023 रोजी सुरुवात झाली होती. यावेळीपासून आतापर्यंत देशातील विविध बाजारात इंदोर बटाटा विक्रीसाठी जात आहे. तेथील तेजी-मंदीचे व्यापारी आणि मोठे शेतकरी शितगृहामध्ये बटाटा साठवून ठेवून भाववाढ झाल्यास शितगृहामधील बटाटा विक्रीसाठी पाठवतात. सध्या खेड्यांमध्ये साठवून ठेवलेला बटाटा जवळपास संपत आला आहे. यामुळे बाजारात इंदोर बटाटा भाव वाढल्याने आग्रा बटाट्याचा भाव देखील वाढला आहे. शितगृहामधील बटाटा बेळगाव बाजारात केव्हा येणार आणि काय भाव होणार याकडे खरेदीदारांचे लक्ष लागून आहे.

काही भाजीपाल्यांच्या दरात वाढ

सध्या जिल्ह्यामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षी पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे विहिरी, नाले, नदी, कूपनलिकेत पाणी कमी प्रमाणात आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्यांच्या पिकांना पाणी अधिक प्रमाणात पाहिजे. सध्या पाणीच नसल्यामुळे अनेक जमिनी कोरड्या पडल्या आहेत. परराज्यातून येणारा भाजीपाला देखील बंद झाला आहे. सद्या बेळगाव परिसरातील भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. उन्हामुळे भाजीपाला चंगल्या प्रकारे येत नाही. उत्तम दर्जाचा भाजीपाला गोवा खरेदीदार खरेदी करतात व उरलेला भाजीपाला इतर खरेदीदार खरेदी करतात, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article