14 मतदारसंघात आजपासून पोस्टल मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 14 मतदारसंघांमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना आजपासून 21 एप्रिलपर्यंत पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज, बीएसएनएल, रेल्वे, दूरदर्शन, प्रसारण, आरोग्य, विमान सेवा, वाहतूक सेवा, अग्निशमन सेवा, वाहतूक पोलीस, ऊग्णवाहिका सेवा, बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन, नियंत्रण कक्ष, ग्रामीण आणि शहरी पेयजल पुरवठा विभाग, कारागृह विभाग आणि मतदानाच्या दिवशी बातम्या प्रसारित करण्यासाठी अधिकृत मीडिया पत्रकारांना पोस्टाने मतदान करण्याची परवानगी आहे. उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर सेंट्रल, बेंगळूर दक्षिण, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार मतदारसंघात आजपासून तीन दिवस पोस्टल मतदान होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात एक पोस्टल मतदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा विभागाशी संबंधित गैरहजर मतदारांना निश्चित केलेल्या कालावधीत मतदान करावे लागणार आहे.